फक्त १३ हजारांमध्ये आला Xiaomi चा नवाकोरा Smart TV; जाणून घ्या फीचर्स

Xiaomi नं Smart TV ची नवीन लाइनअप भारतीय बाजारात लाँच केली आहे. त्यातून Xiaomi Smart TV X Pro, Xiaomi Smart TV A आणि Redmi Fire TV सीरिजचे नवीन मॉडेल बाजारात आले आहेत. हे स्मार्ट टीव्ही वेगवेगळ्या डिस्प्ले साइझमध्ये येतात, ज्यात ३२ इंच ते ५५ इंचाच्या मॉडेल्सचा समावेश आहे. हे टीव्ही शाओमीच्या वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. चला पाहूया यांची किंमत आणि फीचर्स.

Xiaomi Smart TV X Pro सीरिजची किंमत

  • 43-inch: ३२,९९९ रुपये
  • 50-inch: ४१,९९९ रुपये
  • 55-inch: ४७,९९९ रुपये

Xiaomi Smart TV X Pro सीरिजचे फीचर्स

या सीरिजमध्ये ५५ इंचापर्यंतचे डिस्प्ले मिळतात, जे ३८४० x २१६० पिक्सल रिजोल्यूशन, ९४ टक्के डीपीसीआय-पी३ कलर गमुट, ऑटो लो लेटन्सी मोड, डॉल्बी व्हिजन आयक्यू, एचएलजी रिअ‍ॅल्टी फ्लो आणि एचडीआर१०+ ला सपोर्ट करतात.
हे देखील वाचा:
DSLR सारख्या फीचर्ससह आला शक्तिशाली Xiaomi 14 Ultra , जाणून घ्या किंमत आणि संपूर्ण माहिती

प्रोसेसिंगसाठी यात क्वॉड कोर कॉर्टेक्स ए५५ सीपीयू देण्यात आला आहे, सोबत माली जी५२ एमपी२ जीपीयू देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये २जीबी रॅम व १६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यातील ४३ इंचाच्या मॉडेलमध्ये ३० वॉट ड्युअल स्पिकर्स देण्यात आले आहेत जे डॉल्बी ऑडिओ आणि डिटिएक्सला सपोर्ट करतात तर इतर मॉडेल ४० वॉट ड्युअल स्पिकर्सना सपोर्ट करतात.

या सीरिजमध्ये पॅचवॉल ओएस देण्यात आला आहे, ज्यात लाइव्ह चॅनल अ‍ॅक्सेस, पॅरेंटल कंट्रोल, युनिवर्सल सर्च आणि गुगल असिस्टंट सपोर्ट असलेला व्हॉईस कंट्रोल रिमोट देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० आणि ड्युअल बँड वाय-फाय सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात तीन एचडीएमआय २.१ पोर्ट, दोन यूएसबी २.० पोर्ट आणि एक आरजे४५ ईथरनेट जॅक, ३.५ मिमी जॅक, एक एव्ही इनपुट आणि ऑप्टिकल पोर्ट देण्यात आला आहे.

Xiaomi Smart TV A सीरिजची किंमत

  • 32-inch: १२,४९९ रुपये
  • 43-inch: २२,९९९ रुपये

Xiaomi Smart TV A सीरिजचे फीचर्स

सिरीजमध्ये दोन मॉडेल आहेत, ज्यातील ४३ इंचाचा मॉडेल १९२० x १०८० पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करते. तर ३२ इंचाचा मॉडेल एचडी (१३६६ x ७६८) रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात १७८ डिग्री व्यूविंग अँगल, ६०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि व्हिव्हिड पिक्चर इंजिन देखील मिळतं.

कंपनीनं यात क्वॉड कोर कॉर्टेक्स ए३५ सीपीयू आणि माली जी३१ एमपी२ जीपीयू देण्यात आला आहे. सोबत १.५जीबी रॅम व ८जीबी स्टोरेज मिळते. यात २० वॉट ड्युअल स्पिकर्स डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह मिळतात, जे डीटीएस:एचडी आणि डिटिएक्सला सपोर्ट करतात.

पॅचवॉल ओएससह बिल्टइन क्रोमकास्ट, लाइव्ह चॅनल अ‍ॅक्सेस, पॅरेंटल कंट्रोल, युनिवर्सल सर्च आणि गुगल असिस्टंट सपोर्ट असलेला व्हॉईस कंट्रोल रिमोट देखील मिळतो.

कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० आणि ड्युअल बँड सपोर्ट मिळतो. सोबत दोन एचडीएमआय २.१ पोर्ट, दोन यूएसबी २.० पोर्ट आणि एक आरजे४५ ईथरनेट जॅक, ३.५ मिमी जॅक आणि एक एव्ही इनपुट पोर्ट देण्यात आला आहे.

Redmi Smart Fire TV सीरिजची किंमत

  • 32-inch: १२,९९९ रुपये
  • 43-inch: २५,९९९ रुपये

Redmi Smart Fire TV सीरिजचे फीचर्स

या सीरिजमध्ये ४३ इंचापर्यंतचे डिस्प्ले मिळतात, जे ३,८४० x २१६० पिक्सल रिजोल्यूशन, ६०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १७८ डिग्री व्यूविंग अँगल आणि ६.५ मिली सेकंड रिस्पॉन्स टाइम मिळतो. सोबत व्हिव्हिड पिक्चर इंजिन एन्हान्स व्हिज्युअल्स देण्यात आले आहेत. ३२ इंचाच्या मॉडेलमध्ये एचडी रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळतो.

३२ इंचाच्या मॉडेलमध्ये क्वॉड कोर कॉर्टेक्स ए३५ सीपीयू, माली जी ३१ एमपी२ जीपीयू, १जीबी रॅम व ८जीबी स्टोरेज आहे. तर ४२ इंचाचा मॉडेल क्वॉड कोर कॉर्टेक्स ए५५ सीपीयू, माली जी५२ एमपी२ जीपीयू, २जीबी रॅम व ८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

४३ इंचाच्या मॉडेलमध्ये २४ वॉट ड्युअल स्पिकर्स डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह मिळतात. तर ३२ इंचाच्या मॉडेलमध्ये २० वॉट ड्युअल स्पिकर्स मिळतात.

या टीव्ही सीरिजमध्ये बिल्ट इन फायर टीव्ही आणि १२,००० अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस, लाइव्ह टीव्ही चॅनेल्स, पॅरेंटल कंट्रोल, डेटा युजेज मॉनिटरिंग आणि अ‍ॅलेक्सा सपोर्टेड व्हॉईस कंट्रोल रिमोट मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.०, ड्युअल बँड एअर प्ले २ आणि मीराकास्ट सपोर्ट मिळतो. सोबत तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी २.० पोर्ट, अँटेना पोर्ट, एक ईथरनेट जॅक, ३.५ मिमी जॅक आणि एक एव्ही इनपुट पोर्ट देण्यात आला आहे.

Source link

redmi smart fire tvxiaomi smart tv axiaomi smart tv seriesxiaomi smart tv x proशाओमीशाओमी स्मार्ट टीव्हीस्मार्ट टीव्हीस्मार्ट टीव्हीxiaomi smart tv series
Comments (0)
Add Comment