लहान मुलांनी काही वेबसाइट वापरू नये असं बऱ्याच पालकांना वाटतं. या आर्टिकल मधून आपण गुगल क्रोममध्ये वेबसाइट कशी ब्लॉक करायची हे पाहणार आहोत. पुढे आम्ही विंडोज आणि मॅक लॅपटॉपवर वेबसाइट कशी ब्लॉक करायची हे जाणून घेणार आहोत.
विंडोज पॅरेंटल कंट्रोल
गुगलवर युज करा SafeSearch (Windows आणि Mac)
विंडोज आणि मॅकवर वापर Chrome extension
- एकदम सोपा आणि सरळ मार्ग जो विंडोज आणि मॅक ओएसवर देखील वापरता येतो तो म्हणजे गुगल क्रोममध्ये Chrome extension चा वापर करायचा. चला पाहू त्याची पद्धत.
- तुमच्या विंडोज लॅपटॉप किंवा मॅकबुकवर गुगल क्रोम ओपन करा.
- त्यानंतर क्रोम वेब स्टोरमध्ये जाऊन BlockSite हे क्रोम एक्सटेंशन क्रोममध्ये अॅड करा.
- एक्सटेंशन अॅड केल्यावर जी वेबसाइट ब्लॉक करायची आहे तिच्यावर जा.
- एक्सटेन्शनसमधून ‘BlockSite’ निवड करा.
- एक छोटी विंडो ओपन होईल, त्यात ‘Block this site’ वर क्लिक करा, झालं!
विंडोज पॅरेंटल कंट्रोल
जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि त्यांना संवेदनशील वेबसाइटवर जाऊ द्यायचं नसेल तर ही पद्धत वापरा.
- विंडोज लॅपटॉपवर सेटिंग्स ओपन करा.
- त्यानंतर साइड मेन्यूमधून ‘Accounts’ ची निवड करा आणि मायक्रोसॉफ्ट फॅमिलीच्या खाली ‘Open Family app’ वर क्लिक करा.
- अॅप ओपन केल्यावर ‘Add a family member’ वर क्लिक करा. त्यानंतर सेकंडरी मायक्रॉफ्ट अकाऊंट जोडा ज्यावर वेबसाइट अॅक्सेस बंद करायचा आहे.
- अकाऊंट अॅड केल्यावर त्या अकाऊंटवर टॅप करा.
- त्यानंतर ‘Content filters’ ची निवड करा आणि ‘Blocked sites’ वर जा तिथे जी वेबसाइट ब्लॉक करायची आहे तिचं URL टाका.
- तुम्ही प्लस आयकॉनवर क्लिक करून आणखी वेबसाइट देखील जोडू शकता.
गुगलवर युज करा SafeSearch (Windows आणि Mac)
गुगलवर SafeSearch फिचर ऑन केल्यावर तुम्ही संवेदनशील वेबसाइट आणि लिंक तुमच्या सर्चमध्ये येण्यापासून रोखू शकता. हा वेबसाइट ब्लॉक करण्याचा थेट मार्ग नाही पण यामुळे अनावश्यक वेबसाइट रोखता येतात. यासाठी:
- सर्वप्रथम गुगल क्रोमवर जा
- एखादी गोष्ट सर्च करा.
- सर्च रिजल्ट आल्यावर उजवीकडे आलेल्या सेटिंग आयकॉनवर क्लिक करा.
- या मेन्यूमधून ‘More settings’ ची निवड करा.
- त्यानंतर कंटेंट सेक्शनच्या खाली असलेल्या ‘SafeSearch’ ची निवड करा.
- पुढील स्क्रीनवर ‘Filter’ ची निवड करा, झालं!
गुगल SafeSearch कोणत्याही ब्राऊजरवर ऑन करता येतं त्यासाठी फक्त क्रोमचं आवश्यक नाही, फक्त तुमचं सर्च इंजिन गुगल असावं.