रिटेल बॉक्सवर बघा मोबाइलचे वय
मोबाइलचे वय जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रिटेल बॉक्सवरची माहिती. मोबाइल फोनच्या रिटेल बॉक्सवर मॅन्युफॅक्चरिंग डेटचा उल्लेख केलेला असतो, त्यावरून तुम्ही फोनच्या वयाचा अंदाज सहज लावू शकता. परंतु जर तुमच्याकडे फोनचा बॉक्स नसेल तर तुम्ही पुढील पद्धती वापरू शकता.
सेटिंगमध्ये जाऊन जाणून घ्या मोबाइलचे वय
तुमच्या फोनवर सेटिंग अॅप ओपन करा आणि फोनच्या अबाऊट सेक्शनमध्ये जा. इथे तुम्चाला मॅन्युफॅक्चरिंग डेट किंवा असाच एखादा दुसरा शब्द दिसू शकतो. प्रत्येक कंपनीचा युआय वेगळा असल्यामुळे प्रत्येकाची पद्धत देखील वेगवेगळी आहे, त्यामुळे इथे तुम्हालाच शोधाशोध करावी लागेल.
ई-कॉमर्स वेबसाइटवर
जर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून तुमचा मोबाइल फोन मागवला असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटच्या ऑर्डर सेक्शनमध्ये जाऊ शकता. त्यानंतर तिथे असलेल्या यादीत तुम्हाला तुमच्या फोनची ऑर्डर शोधावी लागेल, ज्याच्या समोर फोन डिलिव्हर केल्याची तारीख देखील असेल. यावरून तुम्हाला तुमचा मोबाइल फोन किती जुना आहे हे अगदी सहज समजेल.
थर्ड पार्टी अॅप्स
स्मार्टफोनच्या सिस्टममधून छुपी माहिती बाहेर काढणारे अनेक थर्ड पार्टी अॅप्स उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाइल फोन असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही Phone Info नावाचं अॅप डाउनलोड करा. अॅप ओपन करा आणि डिवाइस सेक्शनमध्ये जा, इथे तुम्हाला फर्स्ट सिन सेक्शन दिसेल जिथे तुमचा फोन कधी वापरला गेला याची माहिती मिळेल.
मॅन्युफॅक्चरिंग कोड
जर तुम्हाला अद्याप तुमच्या फोनचं वय समजलं नसेल तर तुम्ही तुमच्या फोनच्या डायलर मध्ये पुढे दिलेले कोड टाकून सर्व्हिस मेन्यू ओपन करू शकता त्यात तुम्हाला डिवाइसची मॅन्युफॅक्चरिंग डेट मिळेल.
- *#197328640#*
- *#*#197328640#*#*
- *#0000#
ही पद्धत सर्वच स्मार्टफोन्सवर नीट काम करत नाही, हे लक्षात असू दे.
गुगल सर्च करा
जर वरील सर्व पद्धत वापरून देखील तुम्हाला तुमच्या फोनचे वय समजले नसेल तर तुम्ही गुगल सर्चकडे मोर्चा वळवू शकता. गुगल वर तुम्ही तुमच्या मोबाइलच्या मॉडेलची लाँच डेट शोधू शकता. अधिकृत लाँच डेटवरून तुमच्या मोबाइल फोनच्या वयाचा अंदाज लावता येईल.