पुणे : तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख
पुणे पोलिसांना २५ लाखांचे बक्षीस महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी बक्षीस जाहीर केले, ३७०० कोटी रुपयांचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करून अमली पदार्थांची मोठी खेप जप्त करणाऱ्या पुणे पोलिसांना बक्षीस जाहीर केले.पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून तब्बल 3 हजार 600 कोटी रुपये किंमतीचे 1700 किलो ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक करुन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषीक जाहीर केले आहे. तसेच पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेली कारवाई ही नजकीच्या काळातील देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, आर.राजा, संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.