संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे संकेत; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

हायलाइट्स:

  • संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे संकेत
  • चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया
  • राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

पुणेः संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी भाजपासोबत युतीचा पर्याय योग्य असल्याचं संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे. खेडेकरांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत आता भाजपनंही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांची इच्छा व्यक्ती केली. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. आमचा पक्ष देशभरात पसरलेला आहे. देशातील १२ राज्यांच आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं इतक्या सहजतेने हे निर्णय होत नाहीत. त्याची प्रक्रिया मोठी असते. खेडेकरांची नेमकी ऑफर काय ते पाहून चर्चा करु व नंतर निर्णय घेऊ, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचाः ओबीसी आरक्षणः फडणवीसांच्या त्या टीकेवर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

तर, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना या प्रस्तावाबाबत विचारलं असता त्यांनी मला याबाबत कल्पना नाही, असं उत्तर देत अधिक बोलणं टाळलं आहे.

वाचाः मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाइट नोटमध्ये साहिल खानचं नाव

काय आहे प्रकरण?

पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहला असून या लेखात त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्याचे विधान केले आहे. महाआघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीनही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिगेडला दूर ठेवून केवळ त्यांच्या नावाचा आणि कामाचा एकतर्फी लाभ घेणं आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहीत धरून आहेत. भाजपा सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे ही या तीनही पक्षांची मानसिकता आहे. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगडेला खूप मर्यादा आहे. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो, असं मराठा मार्ग या लेखात म्हटलं आहे.

वाचाः परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा झटका; ‘ती’ याचिका फेटाळली

Source link

bjpChandrkant Patilsambhaji brigadesambhaji brigade and bjpचंद्रकांत पाटीलसंभाजी ब्रिगेड
Comments (0)
Add Comment