आपण उशीर पर्यंत काम करतो हे बॉसला दाखवायचं आहे? मग Gmail मध्ये वापर ‘ही’ सोपी ट्रिक

Gmail गुगलची सर्वाधिक वापरली जाणारी ई-मेल सर्व्हिस आहे. त्यामुळे तुम्ही हे वापरत असालच आणि तुम्हाला यातील काही फीचर्स देखील माहिती असतील. परंतु अनेक फीचर असे आहेत, ज्यांची माहिती अनेकांना नसते. यातील एक शेड्यूल फीचर आहे. याच्या मदतीनं कोणताही Email शेड्यूल करून पूर्वनिर्धारीत वेळेवर पाठवू शकता.

ई-मेल शेड्युल करून तुम्ही लोकांना वेळेवर रिमायंडर पाठवू शकता. वाढदिवस, वर्क अ‍ॅनिव्हर्सरीचे ई-मेल शेड्युल करू शकता. किंवा दिलेलं काम जरी सकाळी पूर्ण झालं असेल तर ते पाठवण्याचा ई-मेल संध्याकाळी पाठवून आपण खूप वेळ काम केलं हे देखील दाखवू शकता. या आर्टिकलमध्ये आपण ई- मेल शेड्यूल करण्याची पद्धत पाहणार आहोत.
हे देखील वाचा: पाण्यात पडलेला iPhone तांदळाच्या पिशिवीत ठेवू नका; Apple ने दिली वॉर्निंग

Android आणि iPhone वर कसा करायचा ईमेल शेड्यूल

  1. तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉइड फोनवर जीमेल अ‍ॅप ओपन करा.
  2. ई-मेल लिहण्यासाठी कंपोज बटनवर क्लिक करा.
  3. तुमचा ई-मेल तयार करून घ्या.
  4. वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉट ऑप्शनवर टॅप करा.
  5. इथे तुम्हाला शेड्यूल सेंड ऑप्शन मिळेल, तो सिलेक्ट करा.
  6. त्यानंतर तारीख आणि वेळ सेट करून शेड्यूल करा.
  7. अशाप्रकारे तुमचा ई-मेल शेड्यूल होईल.

Web वर कसा करायचा ई-मेल शेड्यूल

  1. तुमच्या कंप्यूटर किंवा लॅपटॉपमध्ये जीमेल ओपन करा.
  2. टॉप-लेफ्ट कॉर्नरमध्ये असलेल्या कंपोज बटनवर क्लिक करा.
  3. ई-मेल ड्राफ्ट करा.
  4. सेंड बटनच्या बाजूला मोर बटनवर क्लिक करा.
  5. तिथे तुम्हाला शेड्यूल सेंड ऑप्शन मिळेल.
  6. इथे वेळ आणि तारीख एंटर करून ईमेल शेड्यूल करा.

जीमेल मध्ये १०० ईमेल को शेड्यूल करता येतात. तुम्ही शेड्यूल केलेले ई-मेल नेव्हिगेशन पॅनलमधील Scheduled कॅटेगरीमध्ये मिळतील. विशेष म्हणजे टेक जायंट गुगलने २०१९ मध्ये जीमेल युजर्ससाठी शेड्यूल फीचर रोलआउट केलं होतं.

गेल्यावर्षी लाँच झालं हे फीचर

टेक कंपनी गुगलने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जीमेल मोबाइल युजर्ससाठी ट्रांसलेशन फीचर लाँच केलं होतं. याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या भाषेत ई-मेल टाइप करू शकता. हे फीचर टेक्स्ट बॉक्समध्ये ‘ट्रांसलेट करा’ बॅनरच्या स्वरूपात दिसेल. यामुळे युजर्सना खूप मदत होईल, असं कंपनीनं म्हटलं होतं.
याच्या मदतीनं युजर्स सहज ई-मेल टाइप करू शकतील. याआधी गुगलनं ई-मेल प्लॅटफॉर्म जीमेलमध्ये इमोजी रिअ‍ॅक्शन फीचर जोडलं होतं. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या ई-मेलवर इमोजीच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया देऊ शकता.

Source link

gmail tipshow to schedule an emailhow to schedule an email in gmailई मेलजीमेल
Comments (0)
Add Comment