मजेदार इमोजी
या फीचरला ‘ऑडिओमोजिस’ असे म्हणतात. हे फीचर आल्यानंतर युजर्स फोन कॉलवर इमोजीबरोबरच आवाज देऊन रिप्लाय देऊ शकतील. यामध्ये 6 प्रकारच्या साउंड इफेक्ट्सचा समावेश असेल. दुःख, टाळ्या, सेलिब्रेशन, हसणे, ड्रमरोल आणि पूप. असे हे सहा आवाज असतील.विशेष म्हणजे प्रत्येक साउंड इफेक्टसोबत त्याचे ॲनिमेशनही स्क्रीनवर दिसणार आहे.
ॲपबाबत गूगलचे मौन
ऑडिओमोजीस फीचरवर सप्टेंबर २०२३ पासून काम केले जात आहे. या साउंड रिॲक्शन फीचरवर काम सुरु असताना गुगलने मात्र याबाबत मौन बाळगले होते. पण आता बातमी अशी आहे की कंपनी अजूनही यावर काम करत असून लवकरच हे फीचर लॉन्च केले जाऊ शकते. तथापि, फोन ॲपमध्ये हे साउंडइमोजी कसे ॲक्टिव्ह केले जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. साऊंड आणि ॲनिमेशन दोन्ही बाजूला ऐकता आणि पाहता येतील की ते फक्त फीचर ॲक्टीव केलेल्या युजरला ते दिसेल याबाबतीत काही स्पष्टता नाही.
कॉलमध्ये दिसणार इमोजी
गुगलचे हे फीचर फोन ॲपमध्ये आले तर फोन कॉल्स पूर्वीपेक्षा अधिक मजेदार होऊ शकतात. कंपनीचे ॲप Messages देखील इमोजीची सुविधा देते. पण ते मजकुरात आहे. आता गुगल हे फीचर कॉलमध्ये आणण्याची तयारी करत आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.