मस्क यांनी दिले x वर संकेत
आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील संभाषणात, मस्क यांनी ‘XMail येत आहे’. अशा शब्दात नुकतेच या नवीन ई-मेल सर्व्हिस बद्दलचे संकेत दिले. मस्क यांचे हे संभाषण सोशल मीडियावर फिरू लागताच ,Gmail बंद होण्याच्या अफवांना सोशल मीडियावर उधाण आले होते.
x वर नवीन ई मेल सर्व्हिसचे स्वागत
दरम्यान ,एका एक्स युजरने यावर त्वरित आपली प्रतिक्रिया व्यक्त करत “जीमेलवरील विश्वास गमावला असून Xmail वर लवकरात लवकर स्विच करण्याची वेळ आली आहे” अशी कमेंट केली आहे. “मी माझे हॉटमेल जंकसाठी जसे वापरतो, तसेच आता मी माझे Gmail वापरेन” अशीही कमेंट पुढे केली आहे.
जी मेल वि. एक्स मेल
डिमांड सेजच्या सर्वेक्षणानुसार , 2024 पर्यंत जी मेल ही जागतिक स्तरावर 1.8 अब्ज ॲक्टिव्ह यूजर्ससह जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा आहे.
या बातमीला प्रतिसाद देताना, सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट रिया फ्रीमन हिने जीमेलचे X व्हर्जन येऊ शकते अशी संभावना व्यक्त करतांनाच एलोनने ट्विटरमध्ये मोठे बदल केल्यामुळे लोकांचे मत त्यांच्या बाजूने असण्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. “त्यांच्या ईमेल व्यवस्थापनावर लोक विश्वास ठेवतील की नाही हे पाहण्यासारखे आहे,” असेही फ्रीमनने मेलऑनलाइनला सांगितले
जीमेल बंद करण्याच्या अफवांवर गुगलची प्रतिक्रिया
जीमेल बंदचा दावा करणाऱ्या X वर व्हायरल झालेल्या पोस्टने नेटिझन्समध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, Google ने शुक्रवारी X वर Gmail बंद होणार नसल्याची घोषणा केली आहे.