Samsung Galaxy Ring मध्ये काय आहे
सॅमसंगनं गॅलेक्सी रिंगच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती दिली नाही. परंतु शोकेसमधून स्पष्ट झालं आहे की Galaxy Ring मध्ये मेटॅलिक बिल्ड मिळेल, तसेच ही लाइटव्हेट असेल. त्यामुळे २४x७ ही घालून राहता येईल. ही अंगठी वेगवेगळ्या आकारात येईल अशी अपेक्षा आहे.
हेल्थ फीचर्स पाहता गॅलेक्सी रिंग सॅमसंग हेल्थ अॅप सोबत सिंक होईल. तसेच ही हार्ट रेट मॉनिटरिंग, spO2 ट्रॅकिंग आणि स्ट्रेस मॅनेजमेंटला सपोर्ट करेल. कंपनीनं शेयर केलेल्या इमेजेसनुसार ही रिंफ स्ट्रेस मॅनेजमेंट सोबतच स्टेप्स, कॅलरीज आणि डिस्टन्स देखील मॅनेज करेल.
सॅमसंग आपल्या स्मार्ट रिंगमध्ये नव्याने समोर आलेले गॅलेक्सी एआय फिचर देखील देऊ शकते. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स फिचर गॅलेक्सी एस२४ सीरिजमध्ये आले आहेत. लवकरच ते गॅलेक्सी बड्स मध्ये पाहायला मिळतील, तसेच गॅलेक्सी बुक ४ लॅपटॉप सीरिजमध्ये देखील या फीचर्सचा समावेश केला जाईल. त्यांनतर गॅलेक्सी स्मार्टवॉचयामध्ये एआयचा समावेश केला जाईल.
लवकरच Galaxy Ring ची अधिक माहिती समोर येईल. ही स्मार्ट अंगठी यंदा गॅलेक्सी फोल्डेबल फोन्स आणि गॅलेक्सी वॉच सोबत लाँच केली जाऊ शकते.
५ हजारांत Samsung Galaxy Fit3 लाँच
Samsung Galaxy Fit3 ची किंमत ४९९९ रुपये आहे. यात १.५७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. तर बॅटरी याची फुल चार्जवर १३ दिवस चालेल. हा सॅमसंग हेल्थ अॅपच्या मदतीनं युजरचा हार्ट रेट मॉनिटर करतो, झोप कॅल्क्युलेट करतो, तणाव मॉनिटरिंग करतो आणि एक्सरसाइजवर देखील लक्ष ठेवतो. परंतु कंपनीनं एक्सेलेरोमीटर आणि जायरोस्कोप सारख्या सेन्सरचा वापर केला आहे. Galaxy Fit3 मध्ये रिमोट कॅमेरा, फाइंड माय फोन, इमरजेंसी एसओएस, फॉल डिटेक्शन, डू नॉट डिस्टर्ब मोड आणि स्लीप मोड सारखे फीचर्स मिळतात. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी यात आयपी६८ रेटिंग देण्यात आली आहे.