रुग्णांचा सहाय्यक
‘उपचार’ ॲपमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना खूप मदत होणार आहे. कॅन्सरवरील उपचारांसाठी पूरक असे हे ॲप डॉक्टरांची जागा मात्र घेणार नाही. या ॲपच्या मदतीने अनेक फीचर्स मिळतील जे रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकांसाठी सहाय्यकाची भूमिका निभावतील .
सुचवणार योग्य उपचार
कॅन्सरच्या रुग्णांवर एम्समध्ये उपचार केले जातात हे अनेक वेळा माहिती नसल्यामुळे लोक योग्य माहितीअभावी इकडे तिकडे भरकटत राहतात. तसेच अनेकजणांना चुकीच्या माहितीमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागते. मात्र आता या ॲपच्या मदतीने संबंधित विषयावरील कोणतीही माहिती मिळवता येणार आहे. हे ॲप इन्स्टॉल करणेही सोपे आहे .
रेकॉर्ड मेंटेनन्स
एआय अनेक रुग्णांचे सर्व तपशील स्वतःकडे ठेवेल. अशा परिस्थितीत डॉक्टरांना रुग्णावर उपचार करण्यात खूप मदत होईल. ‘उपचार ‘च्या मदतीने पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी आणि क्लिनिकल तपशील राखले जातील. हे सर्व आवश्यक रेकॉर्ड एआय त्याच्या सिस्टममध्ये जोडत राहील. त्याच्या मदतीने, रूग्णांचा इतिहास समजून योग्य उपचार करण्यास डॉक्टरांना मोठी मदत होईल.