बोल्ट ने आणले आकर्षक इअर बड्स ; देणार ७० तासांपर्यंतचा प्लेटाईम

‘BOULT या कस्टमर टेक ब्रँड उत्पादनांशी संबंधित कंपनीने नुकतेच ‘Astra Neo TWS’ या नावाने नवीन earbuds भारतात लाँच केले आहेत. गेल्या काही वर्षांपर्यंत वायरलेस इअरबड्स हे लक्झरीयस गॅझेट मानले जात होते. परंतु आता, ग्राहकांना परवडणाऱ्या ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरबड्सनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. याचाच एक भाग म्हणून व्हिडीओ गेमर्सची आवड लक्षात घेऊन हे इअर बड्स तयार करण्यात आले आहेत. हे इअर बड्स तब्बल 70 तासांपर्यंतच्या प्लेटाईमची (खेळण्याचा वेळ) मुभा देतात.

आकर्षक रंग, वाजवी किंमत

हे इअर बड्स 1,099 रुपयांच्या विशेष किमतीत ऑफर केले जात आहेत. तथापि, ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे ज्यानंतर इयरबड्स 3,499 रुपयांच्या किमतीत बाजारात उपलब्ध होतील.तसेच हे काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रांगांमध्ये उपलब्ध असतील.
हे इअर बड्स ‘Boult’ च्या वेबसाइटवर तसेच ‘Flipkart’ वरही उपलब्ध आहेत.
हे देखील वाचा: १०० तास प्लेबॅक टाइम देणारे Boult Z40 Ultra इअरबड्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

उत्कृष्ट ऑडिओ फील

या इअर बड्समध्ये आम्ही उत्कृष्ट ऑडिओ फील दिला असल्याची माहिती बोल्टचे सह-संस्थापक वरुण गुप्ता यांनी या लाँचिंगच्या निमित्ताने दिली. ‘Astra Neo’ हे केवळ गेमिंग प्रेमींसाठी डिझाइन केलेले नसून आजच्या टेक्नो सॅव्ही तरुण पिढीसाठी एक उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी संगितले. यावेळी त्यांनी हे उत्पादन ‘मेड इन इंडिया’ असल्याचा अभिमान व्यक्त केला .

स्टायलिश डिझाईन

‘Astra Neo TWS’ इअरबड्स एका स्टायलिश डिझाइनसह येतात, त्यांच्या केसमध्ये एलईडी दिवे असतात. युजर्सला चांगला फील देण्यासाठी या केसाला आरामदायी पकड दिली आहे. हे इअरबड्स ‘झेन क्वाड माइक एनव्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन’ ( Zen Quad Mic Environmental Noise Cancellation) ने सुसज्ज आहेत जेणेकरून युजर्सना सुस्पष्ट संवाद साधता येईल.

फास्ट चार्जिंग

चार्जिंग क्षमतेच्या बाबतीत, TWS इयरबड्स फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगसह 100 मिनिटांचा प्लेटाइम ऑफर करण्याचा दावा करतात.ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटीसह आणि गेमिंग मोडमध्ये किमान 40ms च्या लेटेंसीसह, Astra Neo युजर्सना विना व्यत्यय मनोरंजन देण्याचे वचन देते.या इयरबडमध्ये IPX5 वॉटर रेझिस्टन्स आणि ड्युअल-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देखील आहे.

Boult Z40 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Boult Z40 Ultra इअरबड्स मध्ये 35dB नॉइज कॅन्सलेशन फिचर मिळतं. सोबत १०मिमी चे ड्रायव्हर देण्यात आले आहेत. ३ इक्वेलाइजर मोड मिळतात ज्यात Hifi, Bass, आणि Rock चा समावेश आहे. कंपनीनं यात BoomX दिली आहे जिच्यामुळे हाय क्वॉलिटी बेस मिळतो. तरी यातील क्वॉड माइक एनवायरमेंट नॉइज कमी करण्यास मदत करतात. कंपनीनुसार कॉलिंग दरम्यान हे क्लियर व्हॉइससह नॉइज फ्री एक्सपीरियंस देतात.

Source link

boult astra neo featuresboult astra neo launchboult astra neo priceboult astra neo specsboult astra neo tws earbudstech news
Comments (0)
Add Comment