OPPO चे स्मार्ट चष्मा; आता चष्म्यानेच करा कॉल रिसिव्ह

जगविख्यात स्मार्टफोन निर्माता OPPO नेआज एका मेगा इव्हेंटमध्ये ‘OPPO Air Glass 3 XR स्मार्ट ग्लासेस’ या स्मार्ट चष्म्याचे (ग्लासेस) अनावरण केले. या चष्म्यात AI तंत्रज्ञानासह AndesGPT असिस्टंट उपलब्ध असेल. तसेच यात म्युझिक कंट्रोल व कॉलिंग फंक्शन देखील उपलब्ध आहे.

MWC 2024 (मोबाइल वर्ल्ड काँग्रेस)

कालपासून बारसोलेनिया, स्पेन येथे MWC 2024 (मोबाइल वर्ल्ड काँग्रेस) नावाची एक मेगा इव्हेंट सुरु असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाशीसंबंधित उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आज 27 फेब्रुवारी या इव्हेंटचा दुसरा दिवस आहे. आज स्मार्टफोन ब्रँड Oppo ने या मेगा इव्हेंटमध्ये स्मार्ट चष्मा सादर केला आहे. त्याचे नाव OPPO Air Glass 3 XR आहे. हे Air Glass 2 चे पुढचे व्हर्जन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्ट ग्लासमध्ये AI तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात कॉल पिकअपपासून म्युझिक कंट्रोलपर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत. या स्मार्ट चष्म्याबद्दल अधिक माहिती घेऊया.

OPPO Air Glass 3 XR चे फीचर्स

  • Oppo च्या Air Glass 3 XR चे वजन खूपच कमी आहे. त्याची रचना देखील कॉम्पॅक्ट आहे.
  • यात हाय क्वालिटी डिस्प्ले आहे. यामुळे सुस्पष्ट व्हिजन मिळते.
  • या चष्म्याची कमाल ब्राइटनेस 1000 nits आहे.
  • यात AI असिस्टंट ‘AndesGPT’ आणि व्हॉईस कमांडचा सपोर्ट आहे.
  • या स्मार्ट ग्लासेसमध्ये मायक्रोफोन देण्यात आला असून, त्याद्वारे कॉलिंगही करता येते.
  • स्मार्ट ग्लासेसमध्ये टचची सुविधा देण्यात आली आहे. टच बटणाच्या साह्याने म्युजिक कंट्रोल करता येऊ शकते तसेच आणि कॉल रिसीव्ह करता येऊ शकतात.
  • एवढेच नाही तर, तुम्ही स्वाइप करून काचेच्या डिस्प्लेवर फोटो देखील पाहू शकता.

OPPO Air Glass 3 XR ची किंमत

अलीकडील अहवाल आणि लीकनुसार, OPPO Air Glass 3 XR ची किंमत सुमारे 999 डॉलर म्हणजेच सुमारे 82,810 रुपये ठेवली जाऊ शकते. या वर्षाच्या अखेरीस हा स्मार्ट ग्लास भारतासह इतर देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

OPPO चे आणखी एक उत्पादन ‘Oppo Reno 11 5G’

OPPO ने गेल्या महिन्यात ‘Oppo Reno 11 5G’ फोन लॉन्च केला होता. या डिव्हाइसमध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz आहे. यामध्ये 256GB पर्यंत स्टोअरेज आणि 8GB रॅम पर्यंत MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे. यात 5000mAh बॅटरी आहे जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की त्यांची बॅटरी 47 मिनिटांत 100 टक्के चार्ज होते.

Source link

compare mobilegadgetlatest gadgets technology newsmobile phonesmobile prices in indiatech newstechnewstechnology newstop 10 mobilesupcoming mobiles
Comments (0)
Add Comment