संकष्ट चतुर्थीचे महत्त्व
असे सांगितले जाते की, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास शुभ लाभ मिळतो. या दिवशी काही खास वस्तूंचे दान केल्याने तुमचा आनंद द्विगुणीत होतो तसेच तुमच्यावर येणारे सर्व त्रास दूर होतात. घरातील संपत्तीत वाढ होते तसेच सुख,समाधान आणि शांती याची अनुभूती होते.
संकष्टी चतुर्थी 2024 तिथी, शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवाारीला पहाटे 1 वाजून 53 मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवळी 29 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 18 मिनिटांनी संपणार आहे. उदय तिथीमुळे संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी होत असून पारण 29 फेब्रुवारीला होत आहे.
संकष्टी चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ
संकष्टी चतुर्थीला 28 फेब्रुवारीला रोजी रात्री 9.24 वाजता चंद्रोदय होईल.चतुर्थीला चंद्राची पूजा करतात. चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडला जातो.
संकष्ट चतुर्थीनिमित्त खास उपाय
संकष्टी चतुर्थीला गरीब आणि गरजू लोकांना कपडे आणि अन्नपदार्थांचे दान करा. व्यवसायात इच्छित यश मिळविण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दूर्वाच्या २१ गाठींसह गुळ घातलेले लाडू अर्पण करावेत. हा उपाय केल्याने व्यवसायात वाढ होईल.
गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत?
गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. अनलासुर नावाचा एक राक्षस होता.या दैत्याच्या कोपामूळे स्वर्ग आणि धरतीवर त्राही-त्राही माजली होती. अनलासुराचा अत्याचार दिवसें दिवस वाढत होता. सर्व देव हैराण झाले होते, अखेर ते गणपतीला शरण गेले. अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली. गणरायाने संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी अनलासुर राक्षसाला गिळले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. देव, ऋषी, मुनी या सर्वाना त्यांना जमतील ते उपचार सुरु केले. कुठूनतरी गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरु झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर केली.नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. पण काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वाची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि काय आर्श्चय दुर्वाकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह कमी झाला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या.