आजचे राशिभविष्य, 28 फेब्रुवारी 2024 : या राशींना कामाच्या ठिकाणी पुरस्कार, नोकरीत वेगळी जबाबादारी मिळणार ! जाणून घ्या, राशिभविष्य

Aajche Rashibhavishya 28 February 2024 : तुमच्या राशीवर ग्रहताऱ्यांचा प्रभाव कसा पडेल याबद्दल तुम्हाला उत्सकता असेलच. प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते, भविष्यात काय लिहीले आहे. जोडीदाराशी वाद होणार का? नोकरी मिळणार का? माझं घर होणार का? परदेशात जावू शकतो का? गाडी खरेदी करु शकणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

मेष – जोडीदाराशी वाद होतील

मेष राशीतील व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही एखादी योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज ती सुरू करू शकता. प्रेमात असलेले लोक तिसऱ्या व्यक्तीने सांगितल्यामुळे आपल्या जोडीदारावर संशय घेतील त्यामुळे दोघांमध्ये वादविवाद होऊ शकतात. एकापेक्षा अधिक स्त्रोतातून पैशांची आवक झाल्याने तुम्ही आज खुश असाल. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याआधी एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या सोबत असेल. श्री गणेश चालिसाचे पठण करा.
PC:freepik.com

वृषभ – सामाजिक कार्यात सहभागी व्हाल

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये पूर्ण लक्ष द्याल. तुमचे काही विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. यांच्यापासून सावध राहा. काही रखडलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्याने तुम्ही थोडे निराश असाल. तुमच्या मुलांकडून खूप अपेक्षा ठेवू नका नाहीतर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या सोबत असेल. श्वेत चंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकराला तांब्याच्या भांड्यातून जल अर्घ्य अर्पण करा.
PC:freepik.com

मिथुन – तुमचा मान सन्मान वाढणार

मिथुन राशीच्या लोकांच्या सन्मानात आज वृद्धी होणार आहे. तुमच्या मनात चाललेली घालमेल कोणत्याही बाहेरच्या व्यक्ती समोर प्रकट करण्यापासून स्वत:ला आवरा. शेअर बाजारात पैसे लावणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. आज तुमच्या साध्या स्वभावामुळे तुमचा मान सन्मान जास्त वाढेल. तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक बाबींमध्ये एखाद्या बाहेरच्या व्यक्तीकडून सल्ला घेऊ नका. नाहीतर मागाहून तो तुमची निंदा करू शकतो.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या सोबत असेल. गाईला गूळ खाऊ घाला.
PC:freepik.com

कर्क – मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवसा प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागेल तेव्हाच यश मिळेल. तुमच्या आसपासचं वातावरण आनंदी असल्याने तुम्हालाही खूप छान वाटेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या समस्येविषयी तुमच्या जोडीदाराशी बोलू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरची चिंता करीत असाल तर आज तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या सोबत असेल. शिव जपमाळेचे पठण करा.
PC:freepik.com

सिंह – नोकरीत वेगळी जबाबदारी मिळेल

सिंह राशीच्या लोकांनी आज तेच काम करावे जे करण्याची त्यांची इच्छा आहे. जर तुमचा एखादा संपत्ती संबंधी वाद सुरू असेल तर आज तुम्हाला त्यात यश मिळेल. जर तुम्ही नोकरी करीत असाल तर आज तुमच्यावर वेगळी जबाबदारी टाकली जाईल जी तुम्हाला हरप्रकारे पूर्ण करावी लागेल. कौटुंबिक जीवन जगणारे लोकांमध्ये आज काही कारणाने तणाव निर्माण होईल. म्हणून आज अशा कोणत्याही मुद्द्यावर वादविवाद करू नका. जर तुम्ही संतानप्राप्तीसाठी काळजी करीत असाल तर आज ती चिंता दूर होईल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या सोबत असेल. एखाद्या गरजवंताला भाताचे दान करा.
PC:freepik.com

कन्या – पैसे उधार देऊ नका

कन्या राशीच्या लोकांना आज खूप उर्जवान असल्याप्रमाणे वाटेल. पैशांचे व्यवहार सावधतेने करा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. नाहीतर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने कोणताही निर्णय घेणे इष्ट राहील. आज तुम्ही कुटुंबातील लोकांच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. आज तुम्ही तुमची सर्व उर्जा इतर कामात खर्ची घालण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या सोबत असेल. योगसाधना प्राणायाम करा.
PC:freepik.com

तूळ – धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आळसाने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे नाहीतर पुढे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही धार्मिक कार्यात उत्साहाने पुढाकार घ्याल ज्यामुळे तुम्हाला मन:शांती लाभेल. कामकाज करताना जर काही भांडण झालं तर संयमाने ती परिस्थिती हाताळा आणि ते भांडण मिटवा. तुम्हाला व्यावसायिक सल्ल्याची गरज लागेल जो तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून घ्यावा लागेल. जर तुमच्या मुलांच्या शिक्षणात काही अडचणी येत असतील तर आज तुम्ही त्यांच्या शिक्षकांशी बोलून ती अडचण दूर कराल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या सोबत असेल. पहिली पोळी गोमातेस खाऊ घाला.
PC:freepik.com

वृश्चिक –​ सरकारी काम पूर्ण होईल

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहणार आहे. जर तुमचे एखादे सरकारी काम बऱ्याच काळापासून रखडलेले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. जे लोक प्रसार माध्यमे आणि मार्केटिंगशी संबंधित काम करतात त्यांना आज चांगला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात सुरू असलेले विवाद आज संपुष्टात येतील. आज बऱ्याच काळानंतर एखाद्या नातेवाईकाची गाठभेट होईल. कोणी मागितला नसताना कोणालाही उगीचच सल्ला देण्याच्या फंदात पडू नका.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा.
PC:freepik.com

धनू – कामाच्या ठिकाणी पुरस्कार मिळेल.

धनू राशीचे लोक आज गुंतवणुकी विषयी योजना आखण्यात व्यग्र राहतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या चांगल्या कामासाठी तुम्हाला पुरस्कृत केले जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना एखादी नवी मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या आरोग्याच्या चिंतेने ग्रासलेले असाल. तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल नाही तर तुमची बचत संपेल आणि मग तुम्हाला त्यामुळे त्रास होईल.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या सोबत असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे रोज पठण करा.
PC:freepik.com

मकर – धनप्राप्त होईल.

मकर राशीच्या लोकांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस खूप चांगला राहणार आहे. आज एकाहून अधिक स्त्रोतातून धन प्राप्त झाल्याने तुम्हाला अतीव आनंद होईल. आज घरातील देखभाली वर जास्त लक्ष केंद्रित कराल. कुटुंबियांच्या सल्ल्याने तुम्ही एखादे नवे काम सुरू करण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनातील लोकांच्यामध्ये एखाद्या तिऱ्हाईतामुळे भांडण लागेल. अचानक तुमच्या समोर असे खर्च येतील जे तुम्हाला नको असताना करावे लागतील.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या सोबत असेल. रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
PC:freepik.com

कुंभ – चांगली बातमी कळेल

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या चिंतेत भर पडेल. खूप काम असल्याने तुम्ही व्यग्र राहाल, यामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेले वचन तुम्ही विसरून जाल. जर कुटुंबात काही समस्यांचा तुम्हाला त्रास होत असेल तर आज वडीलधाऱ्यांच्या मदतीने आज त्यावर नियंत्रण आणू शकाल. नोकरदार लोकांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या सोबत असेल. पहाटे भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्घ्य अर्पण करा.
PC:freepik.com

मीन – कुटुंबात समतोल राखा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगली मालमत्ता प्राप्त करण्याचा ठरणार आहे. नातेवाईकांशी तुमची जवळीक वाढेल आणि एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक बाबतीत तुम्हाला समतोल राखला पाहिजे. नाहीतर अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या वाढणाऱ्या खर्चांना कात्री लावावी लागेल. नाहीतर तुमचं बजेट वाढू शकते. म्हणून तुमच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवणं तुमच्यासाठी योग्य राहील. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा प्लान बनवत असाल तर गाडी सावधतेने चालवा.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या सोबत असेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.
PC:freepik.com

अनिता किंदळेकर यांच्याविषयी

अनिता किंदळेकर
अनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.… Read More

Source link

28 February 202428 फेब्रुवारी 2024Aajche RashifalHoroscope for WednesdayTodays Daily HoroscopeTodays HoroscopeTodays Rashifalआजचे राशिभविष्यकसा असेल आजचा दिवस?नोकरीत प्रमोशन मिळेल का?
Comments (0)
Add Comment