कोणत्याही खास चष्म्याविना 3D चित्रपट दाखवेल हा टॅबलेट, जाणून घ्या Nubia Pad 3D II ची खासियत

मोबाइल वर्ल्‍ड कांग्रेस २०२४ (MWC) मध्ये जगभरातील बड्या टेक कंपन्या आपले हायटेक प्रोडक्‍ट्स सादर करत आहेत. पावरफुल डिवाइसेस बनवण्यासाठी ओळखली जाणाऱ्या Nubia नं जगातील पहिला 5G + AI 3D टॅबलेट सादर केला आहे. या टॅबमध्ये ३डी कंटेंट बघण्यासाठी चष्म्याची आवश्यकता नाही. कंपनीनं आधी देखील एक ३डी टॅबलेट Nubia Pad 3D आणला आहे. कंपनीच्या मते नवीन टॅबमध्ये 3D रिजोल्यूशनमध्ये ८० टक्के सुधारणा करण्यात आली आहे. 3D ब्राइटनेस देखील दुप्पट करण्यात आली आहे.

चष्म्याविना कसा दिसेल 3D कंटेंट

नुबीयानुसार Nubia Pad 3D II मध्ये एक एआय पावर्ड आय-ट्रॅकिंग इंजिन आहे, तसेच ८६ डिग्री वाइड व्‍यूइंग अँगलच्या मदतीनं 3D स्‍मूद एक्‍सपीरियंससह दिसतं आणि कोणत्याही खास चष्म्याची गरज नाही.
हे देखील वाचा: मोठा डिस्प्ले असलेला अँड्रॉइड टॅबलेट हवा? १२.९५ इंचाच्या स्क्रीनसह येतोय Vivo Pad 3 Pro, पाहा फीचर्स

रिपोर्टनुसार, Nubia Pad 3D II मध्ये निओव्हिजन ३डी टेक्‍नॉलजी आहे. जी एआय एल्‍गोरिदमचा वापर करून रियल टाइम मध्ये 2D कंटेंट 3D मध्ये रूपांतरित करते. त्यामुळे युजर्स वेगवेगळ्या विषयांवरील कंटेंट ३डीमध्ये बघू शकतील. कंटेंट क्रिएटर्ससाठी देखील हा टॅब स्‍पेशल असल्याचं सांगण्यात आलं आहे. दावा आहे की त्यांना 3D शूटिंगसाठी अनेक ऑप्शन्स देखील मिळतील.

इतर फीचर्स पाहता कंपनीनं या टॅबलेटमध्ये क्‍वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर आणला आहे. यात १२.१ इंचाचा 2.5K डिस्‍प्‍ले आहे, जो १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. टॅबमध्ये ४ स्‍पीकर देण्यात आले आहेत आणि साउंड मध्ये ३डी इफेक्‍ट देखील मिळतो. Nubia Pad 3D II मध्ये १० हजार एमएएचची बॅटरी आहे. ही ६६ वॉट की फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करते.

नुबीया फ्लिप फोन देखील लाँच

ZTE च्या मालकीच्या या स्मार्टफोन ब्रँडनं Mobile World Congress 2024 (MWC) मध्ये आपला पहिला फोल्डेबल फोन देखील लाँच केला आहे. कंपनीनं मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी क्लॅमशेल डिजाइनसह Nubia Flip 5G लाँच केला आहे. या फ्लिप फोनमध्ये ६.९ उंचच फोल्डेबल डिस्प्ले मिळतो, हा OLED पॅनल १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेटचा वापर केला आहे. नवीन नुबीया फ्लिप ५जी मध्ये ४,३१०एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याची विक्री सुरु झाल्यावर हा Samsung Galaxy Z Flip 5, Motorola Razr 40 Ultra आणि Tecno Phantom V Flip 5G ला टक्कर देईल, अशी चर्चा आहे.

Source link

mwc 2024nubianubia pad 3dnubia pad 3d ii tabletअँड्रॉइड टॅबलेटनुबीया
Comments (0)
Add Comment