वाद मिटवण्यासाठी घरी बोलावलेल्या बायकोसोबत केलं संतापजनक कृत्य!

हायलाइट्स:

  • वादानंतर तोडगा काढण्यासाठी पत्नीला बोलावलं घरी
  • घरी आलेल्या महिलेसोबत पतीसह कुटुंबाने केलं अमानवी कृत्य
  • अखेर पोलिसांनी आरोपींना केली अटक

औरंगाबाद : वादानंतर तोडगा काढण्यासाठी घरी बोलावलेल्या पत्‍नीला विषारी औषध पाजून जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या पतीसह दीर आणि सासूला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. तिघा आरोपींना १८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी गुरुवारी दिले आहेत.

पती अनिल दगडुजी वानखेडे (४४, रा. एकतानगर, जटवाडा), दीर अशोक दगडुजी वानखेडे (३७) आणि सासू गयाबाई दगडुजी वानखेडे (५५, दोघे रा. जयभिमनगर, टाऊनहॉल) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात सुवर्णा अनिल वानखेडे (३४, रा. एकतानगर) यांनी फिर्याद दिली.

शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची वर्णी

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ मे २००५ रोजी फिर्यादीचे लग्न झाले होते. फिर्यादीचा पती व इतर नातेवाईक फिर्यादीकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याने तिने २६ ऑगस्‍ट रोजी महिला कक्षाकडे तक्रार अर्ज दिला. त्‍याअनुषंगाने १५ सप्‍टेंबर रोजी फिर्यादीसह आरोपींना महिला कक्षात बोलावण्‍यात आले होते. तत्‍पूर्वी १४ सप्‍टेंबर रोजी दुपारी जय भीम नगर येथे नंदोई अनिल निकाळजे, हरिश्‍चंद्र दाभाडे, नणंद सुनिता निकाळजे, दीर अशोक वानखेडे व जाऊ अनिता यांची फिर्यादी सोबत बैठक झाली.

बैठकीत वाद विवाद मिटवण्‍याचे ठरले. १५ सप्‍टेंबर रोजी तारीख झाल्यानंतर सासूने फिर्यादीला, घरी चल, वाद मिटवून टाकू, असं म्हणत जय भीम नगर येथे आणले. तेथे दुपारी १ वाजता पती, सासू व दिराने तिला विषारी औषध पाजून जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा फिर्यादीच्‍या भावाने तिला पोलीस आयुक्तालयात आणले. मात्र फिर्यादीला चक्कर आल्याने दामिनी पथकाने त्‍यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

दरम्यान, आरोपींना गुरुवारी न्‍यायालयात हजर करण्‍यात आलं असता, सहाय्यक सरकारी वकील निता किर्तीकर यांच्या विनंतीनंतर न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

Source link

Aurangabad crime newsaurangabad news todayऔरंगाबादऔरंगाबाद पोलीसपत्नीचा छळ
Comments (0)
Add Comment