MacRumors नं दिलेल्या माहितीनुसार, वेबसाइटच्या फोरमवर अनेकांनी कमेंट करून आयफोन १५ मधील ब्लूटूथची समस्या सांगितली आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये आयफोन १५ च्या पहिल्या विक्रीनंतर लगेचच अश्या कमेंट्स येऊ लागल्या. यात मोठ्या प्रमाणावर अश्या कमेंट्स आहेत ज्यात सांगण्यात आलं आहे की फोन जुने डिवाइस जसे की कार स्टिरिओ आणि हेडफोन्स सोबत नीट कनेक्ट होत नाही.
हे देखील वाचा:
युजर्सनी म्हटलं आहे की ऑडिओ कट होतो आणि पुन्हा कनेक्ट होतो तसेच वारंवार डिस्कनेक्ट होतो. ज्या युजर्सना ही समस्या येत होती त्यांना सांगण्यात आले होते की ही समस्या iOS 17 अपडेटमध्ये सोडवली जाईल. परंतु आयफोनवरील सॉफ्टवेअरचं नवीन व्हर्जन येऊन देखील ही समस्या कायम राहिली आहे. रिपोर्टनुसार हा फक्त बेस मॉडेलमधील प्रॉब्लम नाही तर iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, आणि the iPhone 15 Pro Max या चारही मॉडेलमध्ये ही समस्या येत आहे.
iPhone 15 Bluetooth इश्यूचा परिणाम किती लोकांवर झाला आहे हे स्पष्ट झालं नाही. एवढं मात्र नक्की आहे की प्रत्येक आयफोन १५ मध्ये ही समस्या नाही किंवा प्रत्येक ब्लूटूथ डिवाइस सोबत कनेक्शन इश्यू येत नाही. परंतु अॅप्पलच्या अधिकृत सपोर्ट फोरममध्ये १,७१८ लोकांनी त्यांना देखील ही समस्या येत असल्याचं दर्शवलं आहे.
रिपोर्टनुसार या समस्येवर एकच उपाय आहे तो म्हणजे अॅप्पल कडून रिप्लेसमेंट डिवाइस मागवणे, कारण आयफोन सोबत १ वर्षाची वॉरंटी मिळते. फोन रिस्टार्ट किंवा रीसेट करणे या नेहेमीच्या सोप्या उपायांमुळे ब्लूटूथ नीट होत नाही आहे.
काही लोकांना रिप्लेसमेंट डिवाइस मिळाल्यामुळे ही समस्या गायब झाल्याचं दिसलं आहे. त्यामुळे यावरून अंदाज लावला जात आहे की iPhone 15 च्या फक्त काही निवडक युनिट्समध्ये ही समस्या असू शकते. अॅप्पल कडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु जर कंपनीने याकडे लक्ष दिलं तर समस्येच्या मुळाशी जायला कंपनीला जास्त वेळ लागणार नाही.