boAt Lunar Embrace: सिंगल चार्जमध्ये ७ दिवस चालते नवीन boAt स्मार्टवॉचची बॅटरी, इतकी आहे किंमत

boAt नं Lunar Embrace स्मार्टवॉच लाँच केलं आहे, जो सध्या Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्चवॉच सर्कुलर डिस्प्ले डिजाइनसह आलं आहे. यात युजर्स आपली आवडीनुसार नुसार वॉच फेस कस्टमाइज करू शकतात. तसेच वॉच १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देखील आहेत. boAt Lunar Embrace मध्ये SpO2 आणि स्ट्रेस मॉनिटरिंग सारखे महत्वाचे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

boAt Lunar Embrace भारतात २,८९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आलं आहे आणि हे Amazon इंडिया वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टवॉच स्टील ग्रे आणि स्टील ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आलं आहे.

Lunar Embrace ची वैशिष्ट्ये पाहता, स्मार्टवॉच मेटल बॉडी बिल्डसह येतं. यात १.५१-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. वर सांगितल्याप्रमाणे युजर्स आपल्या आवडीनुसार, वॉच फेस कस्टमाइज देखील करू शकतात. डिवाइस आयपी६८ रेटेड आहे, त्यामुळे यात धूळ व पाणी जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

फीचर्स पाहता, यात ब्लूटूथ कॉलिंग फंक्शन देखील मिळतं, ज्याच्या मदतीनं युजर्स कॉल पिक करू शकतात किंवा डायल देखील करू शकतात. यात २० कॉन्टॅक्ट स्टोर करण्याची सुविधा देखील मिळते.

हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स म्हणून यात हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन लेव्हल (SpO2), स्ट्रेस आणि स्लीप मॉनिटरिंग फीचर्स मिळतात. महिला यात आपल्या मॅन्युस्ट्रल सायकलवर देखील नजर ठेवू शकतात. यात १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडचा देखील समावेश करण्यात आला आहे.

यात गेम आणि म्यूजिक कंट्रोलचा देखील समावेश आहे. जर युजर काही वेळ निष्क्रिय राहिला तर हे घड्याळ त्याला अलर्ट देखील पाठवते. boAt Lunar Embrace व्हॉइस असिस्टंटसह आला आहे आणि यात वेदर अपडेट देखील मिळतात.
कंपनीचा दावा आहे की हे सिंगल चार्जमध्ये ७ दिवसांचा बॅटरी लाइफ देऊ शकतं. परंतु कंपनीनं बॅटरी क्षमतेची माहिती दिली नाही.

Source link

boAtboat lunar embraceboat smartwatchbudget smartwatchsmartwatchबोट लुनार स्मार्टवॉचस्मार्टवॉच
Comments (0)
Add Comment