एअरटेलने लाँच केले ‘रिसायकल प्लास्टिक सिम कार्ड’; कार्बन उत्सर्जन कमी करण्यात पुढाकार

भारती एअरटेल, या भारतातील आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीने पुनर्वापर(रिसायकल) केलेल्या प्लास्टिकपासून बनविलेले सिम कार्ड लॉन्च केले आहे. कंपनीने यासाठी’ IDEMIA Secure Transactions’ सोबत भागीदारी केली आहे. हा IDEMIA समूहाचाच एक भाग आहे. हा गट वित्तीय संस्था, मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आणि ऑटोमोटिव्ह उत्पादकांसाठी पेमेंट आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स प्रदान करतो. एका पत्रकाद्वारे भारती एअरटेल कंपनीने या उपक्रमाची माहिती दिली आहे.

कार्बन उत्सर्जनात मोठी घट

या उपक्रमाद्वारे रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेले सिम कार्ड लॉन्च करणारी एअरटेल ही भारतीय दूरसंचार उद्योगातील पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. आता सिमकार्ड बनवण्यासाठी व्हर्जिन प्लॅस्टिकऐवजी रिसायकल केलेले प्लास्टिक वापरले जाणार आहे. या बदलामुळे एका वर्षात 165 टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचा वापर कमी होईल. याशिवाय 690 टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनही कमी होईल. एअरटेल नेहमीच इको-फ्रेंडली व्यवसाय पद्धतींचा अवलंब करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे या पत्रकाद्वारे नमूद करण्यात आले आहे.

पर्यावरण रक्षणात पुढाकार

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देतांना भारती एअरटेलच्या सप्लाय चेनचे संचालक पंकज मिगलानी यांनी नमूद केले कि , “आम्ही भारतीय दूरसंचार उद्योगाच्या आघाडीवर आणखी एक पुढाकार घेत आहोत हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. एक ब्रँड म्हणून आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम घेत आहोत. शाश्वत उपायांचा अवलंब करण्यासाठी आणि भारतामधये प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याकामी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी ‘IDEMIA’ सोबतचे आमचे सहकार्य हे शाश्वत भविष्य घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

एअरटेलचा इन-फ्लाइट रोमिंग पॅक

एअरटेलने नुकतेच ग्राहक सेवेत आणखी एक पाऊल उचलले असून त्यांनी 195 रुपयांपासून सुरू होणारा ‘इन-फ्लाइट रोमिंग पॅक’ लाँच केला आहे. ग्राहक आता या सेवेअंतर्गत जमिनीपासून हजारो फूट उंचीवर फ्लाइट दरम्यान हाय-स्पीड इंटरनेट ब्राउझिंगचा आनंद घेऊ शकतील, त्यांच्या प्रियजनांशी बोलू शकतील. रु. 2,997 चे रोमिंग पॅक असलेले प्रीपेड ग्राहक आणि रु. 3,999 किंवा त्याहून अधिकचे पोस्टपेड ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्वयंचलित इन-फ्लाइट रोमिंगचा लाभ घेऊ शकतील. ग्राहकांच्या उत्तम प्रवास अनुभवासाठी, इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतून उड्डाण करणाऱ्या 19 विमान कंपन्यांमध्ये Airtel ने Aeromobile सोबत भागीदारी केली आहे. या पॅक अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या प्रवासादरम्यान मदत देण्यासाठी एअरटेलकडे 24X7 संपर्क केंद्र आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकावरून नेटवर्क तज्ञांच्या गटाकडून ग्राहक रिअल-टाइम रिझोल्यूशन सहाय्य मिळवू शकतात.

Source link

Airtelairtel new sim cardsairtel recycled pvc sim cardsairtel simairtel sim cardbharti airtelgreenhouse gasesidemiapankaj miglanirecycled pvc sim cards
Comments (0)
Add Comment