‘Tecno’ ने आणला नवा लॅपटॉप; आता मिळेल फास्ट प्रोसेसिंग

‘Tecno’ या जागतिक स्मार्टफोन ब्रँड असलेल्या कंपनीने ‘Tecno Megabook T16 Pro 2024 Ultra’ या लॅपटॉपचे अनावरण केले आहे. बारसोलेनिया, स्पेन येथे MWC 2024 (मोबाइल वर्ल्ड काँग्रेस) नावाची एक मेगा इव्हेंट सुरु असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाशीसंबंधित उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या इव्हेंटमध्ये ‘Tecno’ ने आपल्या या नवीन लॅपटॉपचे अनावरण केले आहे. हा लॅपटॉप इंटेलच्या शक्तिशाली प्रोसेसरसह येतो. यात मोठ्या स्क्रीनपासून शक्तिशाली बॅटरीपर्यंत सर्व काही एकाच लॅपटॉपमध्ये उपलब्ध आहे.फास्ट प्रोसेसिंगसाठी या लॅपटॉपमध्ये इंटेल कोअर अल्ट्रा ७ प्रोसेसर आहे. याव्यतिरिक्त, यात ड्युअल शार्क थ्रेड फॅन सिस्टम देखील आहे, जे लॅपटॉपचे तापमान नॉर्मल ठेवते व त्याला गरम होऊ देत नाही. नवीन लॅपटॉपची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया…

अशी आहेत लॅपटॉपची वैशिष्ट्ये

‘Tecno Megabook T16 Pro 2024’ अल्ट्रा लॅपटॉपमध्ये 32GB पर्यंत LPDDR5 RAM , 1TB पर्यंत इंटरनल SSD स्टोअरेज हे फीचर्स दिले आहेत जे उत्तम गेमिंग आणि स्पीडसाठी आहे. यात इंटेल कोअर अल्ट्रा 7 चिप आहे. यात Arc मोबाईल जीपीयू आहे. लॅपटॉप थंड ठेवण्यासाठी ‘ड्युअल शार्क थ्रेड फॅन’ देण्यात आले आहेत. त्यात पीसी मॅनेजर ॲप देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे युजर्स सहजरित्या प्रोसेस मॅनेज करू शकतात. हा लॅपटॉप विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

इतर स्पेसिफिकेशन

टेक्नोच्या नवीन लॅपटॉपची रचना अप्रतिम आहे. यात 2.5K रिझोल्यूशनसह डिस्प्ले आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 400 निट्स आणि आस्पेक्ट रेशो 16:10 आहे. त्याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 90 टक्के आहे. याला TUV लो ब्लू लाइट प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. यामुळे युजर्सचा पाहण्याचा अनुभव उत्तम असेल.

किंमत आणि उपलब्धता

Megabook T16 Pro 2024 Ultra ची किंमत किंवा उपलब्धता याबाबत टेक्नोने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. अलीकडील अहवाल आणि लीकवर विश्वास ठेवला तर, नवीन लॅपटॉपची किंमत 80 ते 90 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे. वर्षा अखेरीस ते विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकतील.

TECNO POVA 6 Pro 5G

स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने लॅपटॉपपूर्वी Powa 6 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच केला. या उपकरणाची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यात 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. सुरळीत काम करण्यासाठी, स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6080 चिपसेट, आभासी रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोअरेज आहे. यात 108MP कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.
हा मोबाईल Android 14 वर काम करतो. यात 6000mAh बॅटरी आहे, जी 70W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सध्या, हा स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होणार याबाबत कोणतेही अपडेट मिळालेले नाही.

Source link

mwc 2024TecnoTecno MegabookTecno Megabook T16 Pro 2024लॅपटॉप
Comments (0)
Add Comment