सर्वात स्वस्त 5G Phone बनवण्यासाठी Jio घेणार Qualcomm ची मदत; इतकी असू शकते किंमत

जगातील सर्वात मोठ्या चिप मेकर Qualcomm नं आता भारतावर आपलं लक्ष केंद्रित केलं तेच. कंपनी एका नव्या चिपवर काम करत आहे जिचा वापर देशात एंट्री लेव्हल 5G स्मार्टफोनमध्ये केला जाईल. विशेष म्हणजे यासाठी कंपनी भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर Reliance Jio सोबत काम करत आहे. तसेच इतर कंपन्या देखील सर्वात स्वस्त ५जी फोन बनवण्यासाठी क्वॉलकॉम सोबत काम करत आहेत. यामुळे २जी युजर्सना ५जी स्मार्टफोनवर घेऊन येणं सोपं होईल.

८ हजारांच्या येऊ शकतो Qualcomm-Jio 5G phone

क्वॉलकॉम आगामी एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी आपल्या स्वस्त चिपसेटवर काम करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार चिपमेकर या एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी रिलायन्स जिओ सोबत चर्चा करत आहे. तसेच याबाबत इतर स्मार्टफोन निर्माता कंपन्यांना देखील विचारणा करण्यात आली आहे.

आगामी ५जी स्मार्टफोन मध्ये SA-2Rx क्षमता मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे क्वॉलकॉम बजेट फोन्समध्ये २ अँटेना ५जी स्टॅन्डअलोन सोल्युशन देऊ शकेल. रिसीविंग अँटेना चारवरून दोन करून खर्च कमी करता येईल आणि त्यामुळे परफॉर्मन्सवर जास्त परिणाम होणार नाही, असं क्वॉलकॉमनं म्हटलं आहे.

खर्च कमी होत असल्यामुळे एंट्री लेव्हल ५जी फोनची किंमत ९९ डॉलर्स (सुमारे ८,२०० रुपये) पेक्षा कमी होऊ शकते, असं देखील कंपनीनं म्हटलं आहे. ४जी युजर्सना ५जीवर शिफ्ट करण्यावर कंपनी सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे युजर्सना ४जी एलटीई पेक्षा ५ पट जास्त वेगानं फास्ट स्पीड मिळेल.

भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये स्वस्त चिपसेट दिल्यामुळे २जी फोन युजर्स स्मार्टफोनकडे वळण्याची शक्यता वाढू शकते. तसेच यामुळे ग्राहकांना काही उपयुक्त अ‍ॅप्स वापरता येतील, ज्यात सरकारी अ‍ॅप्स आणि सरकारी योजनांचा देखील समावेश आहे. GSMA डेटाचा आधार देत कंपनीनं म्हटलं आहे की या ९९ डॉलर्सच्या स्मार्टफोनमुळे जगभरातील सुमारे २.८ अब्ज युजर्स ५जी चा वापर करायला सुरुवात करू शकतात.

Source link

cheap 5g phonejio 5g phoneReliance Jioस्वस्त ५जी फोन५जी फोन
Comments (0)
Add Comment