Pune-इस्टेट एजंट भासवून घरात घुसून दागिने व मोबाईल चोरणारे चोरट्याला अटक सहकार नगर पोलीस

पुणे _ तेज पोलीस टाइम्स-परवेज शेख

Pune-इस्टेट एजंट भासवून घरात घुसून दागिने व मोबाईल चोरणारे चोरट्याला अटक सहकार नगर पोलीस स्टेशनची कामगिरी.इस्टेट एजंट असल्याचे भासवून प्रॉपर्टी विकत घेण्याच्या बहाण्याने घरात घुसला. घर पाहण्याच्या बहाण्याने महागडा फोन व सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला होता.

अनिल ज्ञानेश्वर मलठणकर (वय-58 रा. आंबेडकर शाळेसमोर, लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुमित चव्हाण (रा. सहकारनगर नं. 1) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यातसुमीत चव्हाण यांना एका व्यक्तीने तुमचे घर पाहण्यासाठी एका पार्टीला घरी घेऊन येतो असे सांगितले होते. याबाबत त्यांनी त्यांच्या आईला सांगून ते बाहेर निघून गेले. दुपारी दीडच्या सुमारास ते घरी आले असता त्यांना टेबलवर ठेवलेला Apple कंपनीचा दुसरा मोबाईल दिसला नाही. त्यावेळी त्यांनी आईकडे विचारणा केली. आईने साडे अकरा वाजता एक व्यक्ती घरी आला. त्याने तुमचे घर पाहून येतो असे म्हणून आतील खोलीत गेल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना आईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र दिसले नाही. याबाबत विचारले असता तिने मंगळसुत्र उशाला ठेवल्याचे सांगितले. उशाखाली तपासले असता मंगळसुत्र दिसले नाही. चोरट्याने मंगळसुत्र व मोबाईल चोरुन नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यावरुन पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांना माहिती मिळाली की, मंगळसुत्र व आयफोन चोरणारा व्यक्ती उरुळी कांचन परिसरात आहे. त्यानुसार पथकातील अंमलदार सागर सुतकर यांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीचा ठावठिकाणा शोधला. पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील , सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, विशाल वाघ, सागर सुतकर, बजरंग पवार, किरण कांबळे, महेस मंडलिक, निलेस शिवतारे, नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांच्या पथकाने केली.

Comments (0)
Add Comment