गुगल मॅप्सवरील नवीन ‘ग्लान्सेबल डायरेक्शन’ फीचर म्हणजे काय? जाणून घ्या

गुगलने गेल्या वर्षीच या फीचरची घोषणा केली होती. हे फीचर तुम्हाला तुमचा फोन पुन्हा पुन्हा अनलॉक न करता सहजपणे मॅप नेव्हिगेट करण्यात मदत करेल.गुगलने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या वैशिष्ट्याची घोषणा केली होती आणि जून 2023 मध्ये ठराविक भागात ते सुरु होईल असे सांगण्यात आले होते. आता मात्र जगभरातील युजर्ससाठी हे फीचर आणले जात आहे .

‘ग्लान्सेबल डायरेक्शन’ चे फीचर्स

या फीचरच्या साह्याने तुम्ही एकदा गुगल मॅप सुरु केल्यानंतर तुम्ही चालत असतांना किंवा गाडी चालवत असतांना तुम्हाला वारंवार स्क्रीन अनलॉक करत पुन्हा पुन्हा मॅप सुरु करण्याची गरज राहत नाही. नवीन गूगल ‘ग्लान्सेबल डायरेक्शन’ फीचर तुम्हाला थेट तुमच्या लॉक स्क्रीनवर दिशानिर्देश पाहण्याची परवानगी देईल.

Android युजर्स फोनच्या लॉक स्क्रीनवरूनही दिशानिर्देश आणि थेट ETA (एस्टीमेटेड टाईम ऑफ अरायव्हल) पाहू शकता. तुम्ही स्टार्ट बटण दाबले नाही तरीही हे फीचर ॲपमधील रूट ओव्हरव्ह्यू स्क्रीनवर देखील कार्य करते. iOS फोनमध्ये हे फीचर ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याचे ‘लाइव्ह ॲक्टिव्हिटीज’ वापरेल.

गुगल मॅप्समध्ये ‘नॅव्हिगेट करताना ‘ग्लान्सेबल डायरेक्शन’ कसे ॲक्टिव्ह करावे

हे फीचर डीफॉल्टनुसार बंद केलेले आहे, म्हणून तुम्ही ते पर्सनली ॲक्टिव्ह केले पाहिजे. ते कसे करायचे ते इथे देत आहोत .

  • Google Maps वर, वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  • सेटिंग्ज वर टॅप करा.
  • खाली स्क्रोल करा आणि नेव्हिगेशन सेटिंग्ज निवडा.
  • ‘नॅव्हिगेटिंग करताना ग्लेन्सेबल डायरेक्शन’ शोधा आणि ते ॲक्टिव्ह करा.
  • नवीन नॅव्हिगेट करताना ‘ग्लेन्सेबल डायरेक्शन’ फीचर वापरणे सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर Google Maps ॲप अपडेट करावे लागेल.

या फीचरचा उद्देश

या फीचरचा उद्देश युजर्सना त्यांच्या सहलींचे नियोजन करण्यात मदत करणे आणि त्यांची प्रवासातील लिंक तुटू न देता त्यांना आवश्यक वेळी ॲक्टिव्ह करणे हा आहे. Google Maps मधील वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक क्रिस्टीना टोंग यांच्या मते, युजर्सकडे त्यांनी आधीच पाहिलेली ठिकाणे काढून टाकण्याची, एकाच वेळी अनेक सहलींची योजना आखण्याची आणि त्यांच्या प्रवासातील साथीदारांसह काही ठिकाणे (जसे की आकर्षणे किंवा हॉटेल्स) शेअर करण्याची फ्लेक्सिबिलिटी असते. एकदा युजर्सनी त्यांना व्हीझीट करायची ठिकाणे निश्चित केल्यावर, ते तीन किंवा अधिक डेस्टिनेशन निवडू शकतात. “दिशानिर्देश” वर क्लिक केल्यानंतर Google नकाशे एक सर्वसमावेशक मार्ग तयार करेल ज्यामध्ये युजर्सनी निवडलेल्या सर्व थांब्यांचा समावेश असेल. हा मार्ग युजर्सच्या रीसेन्ट सेक्शन मध्ये सेव्ह केला जाईल.

Source link

googleGoogle MapsGoogle Maps Glanceable Directionगुगलगुगल मॅप्स
Comments (0)
Add Comment