जर्मन शेफर्ड अवतरला रोबोट स्वरूपात; MWC 2024 मध्ये आला TECNO चा रोबोटिक कुत्रा डायनॅमिक

थोडा गोंडस, थोडा विचित्र आणि बराचसा खेळकर असे एखाद्या सामान्य पाळीव कुत्र्यामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी ज्याच्यात दिसतात तो आहे डायनॅमिक! परंतु, डायनॅमिक हा काही खराखुरा कुत्रा नव्हे तर तो आहे जर्मन शेफर्डने प्रेरित असलेला ‘TECNO’ चा रोबोटिक कुत्रा! होय तो एक रोबोट आहे मात्र त्याच्या सर्व हालचाली अगदी आपल्या घरातीलच एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे आहेत. डायनॅमिक 1, TECNO या रोबोटिक AI कुत्र्याचे अनावरण बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2024) या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबांधित प्रदर्शनात करण्यात आले.

‘डायनॅमिक 1’ करतो पाळीव कुत्र्याची नक्कल

‘डायनॅमिक 1’ हा जर्मन शेफर्डने प्रेरित असलेला कुत्रा हा खऱ्या कुत्र्यांच्या वर्तनाची नक्कल करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
‘डायनॅमिक 1’ कुत्र्याच्या नैसर्गिक हालचालींची नक्कल करण्यासाठी अतिशय बारकाईने तयार केले गेले आहे. त्याच्या सर्व हालचाली जसे की डोके आणि शरीराची हालचाल ,खेळकरपणा, अगदी नाचणेसुद्धा घरातील पाळीव प्राण्यांसारखेच आहे.

‘डायनॅमिक 1’ चे स्पेसिफिकेशन

TECNO च्या मते, या हालचालींमधील अचूकता ‘एआय हायपरसेन्स फ्यूजन सिस्टम’ आणि ‘8-कोर एआरएम सीपीयू’ च्या पावर्ड (powered) मोटर्सच्या सिंक्रोनाइझ केलेल्या सिस्टिमद्वारे मिळवली जाते. RealSense D430 डेप्थ कॅमेरा, ड्युअल ऑप्टिकल सेन्सर्स आणि इन्फ्रारेड सेन्सर्स सारख्या विविध सेन्सर्ससह सुसज्ज असा हा ‘डायनॅमिक 1’ त्याच्या सभोवतालचा परिसर प्रभावीपणे कॅप्चर करतो. याव्यतिरिक्त, यात व्हॉइस कमांड ओळख ॲक्टिव्ह करण्यासाठी चार मायक्रोफोन आहेत. तूर्तास ‘डायनॅमिक 1’ 15,000 mAh बॅटरीवर अंदाजे 90 मिनिटांचा प्लेटाइम ऑफर करतो. ‘डायनॅमिक 1’ खरेदीसाठी उपलब्ध असेल कि तो केवळ AI आणि रोबोटिक्स कौशल्ये सुधारण्यासाठी एक चाचणी डिव्हाइस राहील याबद्दल TECNO ने अद्याप माहिती दिलेली नाही.

स्मार्टफोन्सच्या भविष्याची चाहूल

‘डायनॅमिक 1’ चे अनावरण हे या वर्षीच्या MWC मधील अधिक रोमांचक घडामोडींपैकी एक होते. TECNO च्या मते , या रोबोटिक डॉगच्या रूपाने भविष्यात TECNO स्मार्टफोन्सच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळतील. ‘डायनॅमिक 1’ प्रमाणेच ऑलराऊंडर आणि आपल्याला रिऍक्ट करणाऱ्या आधुनिक मोबाईल डिव्हाइसची कल्पना यावरून करता येते .

Xiaomi ने ही केले ‘Cyberdog 2’ चे प्रदर्शन

हा अनोखा कुत्रा Tecno बूथवर गाजत असला तरी , रोबोटिक पाळीव प्राण्यांची हि जगातील पहिलीच एन्ट्री नाही. MWC 2024 मध्ये, अगदी Xiaomi ने देखील ‘Cyberdog 2’ चे प्रदर्शन केले आहे , 2021 मध्ये Xiaomi ने सादर केलेल्या व्हर्जनपेक्षा हे एक अपग्रेडेड व्हर्जन आहे.

Source link

dyanamic 1mwc 2024robot dogTecnotecno robotic dogwhat is dynamic one
Comments (0)
Add Comment