वनप्लस सारख्या रेनवॉटर स्मार्ट टच टेक्नॉलॉजीसह Realme ने लाँच केला बजेट फ्रेंडली फोन, इतकी आहे किंमत

रियलमीनं इंडोनेशिया मध्ये Realme 12 Pro+ 5G सह Realme 12+ 5G लाँच केला आहे. विशेष म्हणजे प्रो प्लस मॉडेल आधीच भारतात उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे आम्ही फक्त Realme 12+ 5G ची माहिती देत आहोत. जो १२०हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले, ५०एमपी सोनी एलवायटी६०० सेन्सर, मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेट आणि अनेक जबरदस्त फीचर्ससह आला आहे. याची किंमत देखील बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे.

Realme 12+ 5G ची किंमत

Realme 12+ 5G स्मार्टफोनचा इंडोनेशियामध्ये सिंगल स्टोरेज ऑप्शन आला आहे. ज्यात ८जीबी रॅमसह २५६जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. मोबाइलची किंमत Rp ४,१९९,००० म्हणजे भारतीय किंमत नुसार जवळपास २२,२०० रुपये आहे. फोन इंडोनेशिया मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे आणि ८ मार्चपासून याची विक्री सुरु होईल. विशेष म्हणजे Realme 12+ 5G भारतात ६ मार्चला लाँच होत आहे.

Realme 12+ 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 12+ 5G मध्ये ६.६७-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले मिळतो. यात फुल एचडी+ २४०० × १०८० पिक्सल रिजॉल्यूशन, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २०००निट्स पीक ब्राइटनेस, ५०,००,०००: १ कंट्रास्ट रेशियो, HDR10+ आणि रेनवॉटर स्मार्ट टच स्क्रीन देण्यात आली आहे. जी काही दिवसांपूर्वी वनप्लस डिवाइसमध्ये दिसली होती.

नवीन रियलमी मोबाइलमध्ये युजर्सना परफॉरमेंससाठी माली जी६८ जीपीयूसह मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० चिपसेट मिळतो. यात ८जीबी रॅम + ८जीबी डायनॅमिक रॅमचा सपोर्ट आहे तर २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. Realme 12+ 5G मध्ये ड्युअल-सिम, ५जी, वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी, जीपीएस असे अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. Realme 12+ 5G चं वजन १९० ग्राम आणि डायमेंशन १६३ × ७५.५ × ७.९ मिमी आहे. हा मोबाइल रियलमी युआय ५.० आणि अँड्रॉइड १४ वर आधारित आहे.

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा यूनिट देण्यात आला आहे. ज्यात एफ/१.८८ अपर्चर, LED फ्लॅश आणि OIS सह ५०एमपीचा सोनी एलवायटी६०० प्रायमरी सेन्सर, ८एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि २एमपी मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी १६एमपीचा कॅमेरा आहे. फोनमध्ये ५,०००एमएएचची मोठी बॅटरी आणि चार्जिंगसाठी ६७वॉट सुपरवुक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जात आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ऑडियोसाठी हाई-रेज ऑडियोसह स्टीरियो स्पिकर सेटअप आहे. इतकेच नव्हे तर मोबाइल आयपी५४ धूळ आणि पाण्यापासून फोनचे संरक्षण करते.

Source link

realmeRealme 12 plus 5GRealme 12 plus 5G launchRealme 12 plus 5G Priceरियलमीरियलमी स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment