टच स्क्रीन आणि आधुनिक इंटरफेस
नव्याने तयार करण्यात आलेली ऑफिसजेट प्रो सीरीज , सध्याच्या जलद गतीने चालणाऱ्या कामांसाठी, व्यवसायांसाठी आवश्यक असलेल्या वैविध्यपूर्ण सुविधांनी युक्त आहे. ह्या सर्वसमावेशक पोर्टफोलिओमध्ये उद्योगक्षेत्रातील पहिल्याच वाइड-फॉरमॅट बिझनेस इंकजेट प्रिंटर्सच्या श्रेणीचा समावेश आहे. ह्या श्रेणीतील उत्पादनांना पीथ्री कलर सपोर्ट आहे. त्यामुळे वेगवेगळ्या साईझमधील प्रिंटिंगसाठी तसेच स्कॅनिंगसाठी रंगांची अचूक पुननिर्मिती होईल ह्याची खात्री देण्यात आली आहे. ह्या मालिकेत युजरच्या अनुभवाला प्राधान्य देऊन अधिक व्यापक टच स्क्रीन आणि आधुनिक इंटरफेस देण्यात आला आहे. त्यामुळे नेव्हिगेशन सुलभ होणार आहे.
मिळणार प्रोफेशनल लेव्हलचे प्रिंटिंग
ह्या उत्पादनामध्ये ४५ टक्क्यांपर्यंत रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. ह्याशिवाय एचपी ९३८/९२५ ओरिजिलन इंक कार्ट्रिजेसही बाजारात आणली जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला प्रोफेशनल लेव्हलचे प्रिंटिंग मिळणार आहे.
एचपी ऑफिसजेट प्रो ९७२० व ९७३० वाइड फॉरमॅट ऑल-इन-वन मालिका(सीरीज ) फीचर्स
- अचूकता व कार्यक्षमता ह्यांच्यासह प्रभावी प्रकल्पांवर काम करणारे नियोजनकर्ते, डिझायनर्स, आर्किटेक्ट्स आणि इंजिनीअर्स ह्यांच्यासठी ही उत्पादने घडवण्यात आली आहेत.
- ट्रू-टू-स्क्रीन मुद्रणामध्ये पीथ्री कलरचा समावेश आहे, त्यामुळे एसआरजीबीच्या तुलनेत २५ टक्के अधिक रुंद रंगश्रेणी ह्यात मिळते.
- एथ्री आकारमानापर्यंतच्या माध्यमांमध्ये प्रिंटिंग व स्कॅनिंग होते, त्यामुळे विविध आवश्यकतांची पूर्तता खात्रीने होते.
- मोठ्या टच स्क्रीनमुळे वापरकर्त्याला अधिक चांगला अनुभव मिळतो
- कागद संपत आल्याचा (लो-ऑन-पेपर) सेन्सर असल्यामुळे कार्यप्रवाह खंडित होणे टाळता येते.
- २२ पीपीएमपर्यंत वेगवान मुद्रण साध्य होते, त्याचबरोबर ५०० पानांपर्यंतच्या इनपुट ट्रे ह्यात आहे
- सेल्फ-हीलिंग ड्युअल-बॅण्ड वाय-फायने सुसज्ज असलेली एचपी वुल्फ प्रो सिक्युरिटी अखंडित समन्वयासाठी आणि संवेदनशील प्रकल्प डेटा सुरक्षित राखण्यासाठी निर्णायक ठरते.
- वेगवेगळ्या आकारमानाच्या फाइल्स प्रिंट करण्यासाठी एचपी स्मार्ट क्लिक तसेच एफोर-एथ्री प्रिंटिंग व स्कॅनिंग अनुकूलतेसाठी स्वयंचलित डॉक्युमेंट फीडर ह्यांसारख्या वेळ वाचवणाऱ्या सुविधांनी युक्त असे हे उत्पादन आहे.
- ३० टक्के रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर करण्यात आलेले हे उत्पादन पर्यावरण पूरक आहे
एचपी ऑफिस जेट प्रो ९१३० ऑल-इन-वन सीरीजचे फीचर्स
- कॉर्पोरेट व्यवसाय, शाखा कार्यालये व संमिश्र मनुष्यबळासाठी ठोस उत्पादनक्षमता उपायांसह टीम्सना सक्षम करणारी सीरीज.
- स्वयंचलित डॉक्युमेंट फीडर, दुप्पट आकारमानाच्या मुद्रण आणि स्कॅनिंग क्षमता ह्यांनी सुसज्ज.
- २५ पीपीपएमपर्यंत वेगाने प्रिंटिंग. त्याशिवाय मोठ्या सप्लायसाठी ५०० पानांचा इनपुट ट्रे.
- सेल्फ-हीलिंग ड्युअल-बॅण्ड वाय-फाय आणि एचपी वुल्फ प्रो सिक्युरिटी ह्यांच्या माध्यमातून जोडणी व सुरक्षिततेची खात्री.
- ४० टक्के रिसायकल्ड प्लास्टिकच्या वापर.
एचपी ऑफिसजेट प्रो ८१२० ऑल-इन-वन सीरीजचे फीचर्स
- घरातून काम करणाऱ्या व्यक्तींना काम अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी आवश्यक फ्लेक्सिबल तंत्रज्ञान उपलब्ध करून देते.
- २० पीपीएमपर्यंत वेगाने मुद्रण, २२५ पानांचा इनपुट ट्रे, स्वयंचलित डॉक्युमेंट फीडर आणि दुप्पट आकारमानाच्या प्रिंटिंगची सुविधा.
- संमिश्र पद्धतीने काम करणाऱ्यांसाठी अखंडित समन्वय राखण्यासाठी दस्ताऐवज क्लाउडमध्ये साठवले जाण्याची सुविधा.
- क्वाएट मोड सुविधेमुळे लक्ष विचलित न होता काम करण्याचा अनुभव.
- सेल्फ-हीलिंग, ड्युअल-बॅण्ड वाय-फायमुळे अखंडित कनेक्टिव्हिटी.
- पूर्ण रंगीत स्क्रीन आणि गतीशील २.७ इंची सीजीडीचा समावेश.
- ऑफिसजेट प्रो ८१२० सीरीजसह ४५ टक्के रिसायकल्ड प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले उत्पादन.
किंमत आणि उपलब्धता:
- एचपी ऑफिसजेट प्रो ९७२० आणि ९७३० वाइड फॉरमॅट ऑल-इन-वन मालिका अनुक्रमे २५,३८५ रुपये आणि ३८,१२५ रुपये किमतीला उपलब्ध आहे
- एचपी ऑफिसजेट प्रो ९१३० ऑल-इन-वन मालिका ४५,९०६ रुपये किमतीला उपलब्ध आहे
- एचपी ऑफिसजेट प्रो ९१३० ऑल-इन-वन मालिका २१,५६२ रुपये किमतीला उपलब्ध आहे