आई-वडिल, बहिण-भाऊ, चिमुकली मुलं सगळी झाली ठार, अखेर ११ जणांचे मृतदेह सापडले

हायलाइट्स:

  • बाप-लेक, बहिण-भाऊ, चिमुकली मुलं सगळी झाली ठार
  • अखेर ११ जणांचे मृतदेह सापडले
  • संपूर्ण कुटुंबावर शोककळा

अमरावती : अमरावतीमधील बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह सापडले असल्याची माहिती समोर येत आहे. एकाच कुटुंबातील या सगळ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सर्व मृतांचे शवविच्छेदन नदी पात्रालगतच घटनास्थळी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे गाडेगावचे मटरे कुटुंब व त्यांचे नातेवाईक दशक्रिया विधी आटोपल्यानंतर या कुटुंबातील लोक नाव (बोटीत) बसून नदीत पात्रात फिरत होते. मात्र, बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने बोट उलटली झाली. यात १३ जण बुडाले होते तर दोघांना पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

धक्कादायक म्हणजे या अपघातामध्ये तब्बल ११ जणांना जलसमाधी मिळाली होती. घटनेच्या दिवशी ३ जणांचे मृतदेह सापडले होते तर आज बेपत्ता असलेल्या ८ जणांचे मृतदेह सापडले असून या घटनेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शोधण्यासाठी NDRF, SDRF व जिल्हा शोध व बचाव पथक अशी ७० लोकांची टिम होती.

तिन्ही पथकांनी जवळपास वर्धा नदी पात्रातील ३५ किलोमीटर परिसर छाणून काढला होता. मात्र, आज सकाळी टप्प्या टप्प्याने सर्व ८ जणांचा मृतदेह सापडले आहेत तर आता सर्वच मृतदेह सापडल्याने शोध मोहीम थांबली आहे.
‘सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल’
मृतकांची नावे…

१) नारायण मटरे वय ४५ वर्ष

२)किरण विजय खंडाळे वय २८ वर्ष

३)वंशिका प्रदीप शिवनकर वय २ वर्ष

४)अतुल गणेश वाघमारे वय २५ वर्ष

५)वृषाली अतुल वाघमारे वय २० वर्ष

६)आदिती सुखदेव खंडाळे वय १० वर्ष

७)मोहिनी सुखदेव खंडाळे वय १२ वर्ष

८)अश्विनी अमर खंडाळे वय २१ वर्ष

९)निशा नारायण मटरे वय २२ वर्ष

१०)पियुष तुळशीदास मटरे वय ८ वर्ष

११)पूनम प्रदीप शिवनकर वय २६ वर्ष
मुंबईः बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला; नऊ जखमी
दोनजण बचावले

१)श्याम मनोहर मटरे वय २५ वर्ष

२)राजकुमार रामदास उईके वय ४५ वर्ष

Source link

amravati latest corona news todayamravati live news todayamravati news live today coronaamravati news todayamravati news today liveamravati weather todayboat accident in amravati
Comments (0)
Add Comment