X प्लॅटफॉर्मवर आता जॉब सर्च
X हे सर्व सेवा प्रदान करणारे ॲप व्हावे अशी इलॉन मस्क यांची खूप पूर्वीपासून इच्छा होती. आतापर्यंत तुम्ही X ॲपद्वारे आपले मत व्यक्त करू शकत होतात. कॉलवर X कॉन्टॅक्ट युजर्सशी बोलू शकत होतात . आता X युजर्स या प्लॅटफॉर्मवर नोकरीदेखील शोधू शकतात. कंपनीने उघड केले आहे की, X वर जॉबच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी 1 दशलक्षाहून अधिक कंपन्या शोधत आहेत.
हे देखील वाचा:
‘XHiring’ वर 10 लाख नोकऱ्या पोस्ट
X च्या हायरिंग खात्याचे पोस्ट पुन्हा पोस्ट करत, एलोन मस्क यांनी ट्विट केले आहे की, कंपन्या X वर नोकऱ्या पोस्ट करण्यात इंटरेस्ट दाखवत आहेत. X बिझनेसने दावा केला आहे की, X हायरिंगवर 10 लाख नोकऱ्या पोस्ट करण्यात आल्या आहेत. ‘XHiring’ हे X चे जॉब सर्च पोर्टल आहे. X जॉब पोस्टिंगमध्ये AI, फायनान्स आणि SaaS शी संबंधित कंपन्यांसाठी जॉब पोस्ट आहेत.
लवकरच iOS आणि Android डिव्हाइसवर
हे जॉब सर्च पोर्टल सध्या वेब युजर्ससाठी उपलब्ध आहे परंतु कंपनीने घोषणा केली आहे की, ते लवकरच iOS आणि Android डिव्हाइसवर देखील उपलब्ध होईल. केवळ टेक्स्ट आधारित मेसेजिंग पलीकडे जाऊन, पर्सनल वन टू वन कॉन्टॅक्टसाठी यात काही ॲडिशनल फीचर्स असतील असे मस्क यांनी संकेत दिले आहेत. यामध्ये ऑडिओ असो किंवा व्हिडिओ या सर्व सेवा सहज उपलब्ध असतील.
एक्सची यूट्यूबशी स्पर्धा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X मध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. X ने यूजर्सला व्हिडिओ कंटेंट शेअर करण्याचीहि सुविधा दिली आहे. त्यामुळे X प्लॅटफॉर्म आता युट्युबशीही स्पर्धा करत असल्याचे बोलले जात आहे.
X वरून ऑडिओ-व्हिडिओ कॉल करा
अलीकडेच X ने सर्वांसाठी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा जारी केली आहे. याद्वारे तुम्ही कोणत्याही X वापरकर्त्यांशी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलवर बोलू शकाल. सध्या हे वैशिष्ट्य प्रीमियम ग्राहकांसाठी आहे परंतु लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल.