स्मार्टफोनच्या किंमतीत खरेदी करा 2-in-1 लॅपटॉप; टॅबलेट प्रमाणे देखील येतील वापरता

नवीन लॅपटॉपवर जास्त खर्च करण्यापेक्षा २-इन-१ मॉडेल खरेदी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. २-इन-१ लॅपटॉपचा नवीन ट्रेंड बाजारात आला आहे. कारण युजर्स यांचा वापर हवा तेव्हा टॅबलेट प्रमाणे देखील करू शकतात आणि यात टच-स्क्रीन डिस्प्ले मिळतो. पावरफुल परफॉर्मन्स असलेले ब्रँडेड २-इन-१ लॅपटॉप तुम्ही ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता. चला पाहूया HP पासून लेनोवो सारखे ब्रँड्सचे कन्व्हर्टेबल लॅपटॉप मॉडेल्सचा समावेश आहे.

HP Chromebook x360 Intel Celeron N4120

विश्वासू ब्रँड HP चा टचस्क्रीन असलेला कॉम्पॅक्ट क्रोमबुक मॉडेल Amazon वर २० टक्के डिस्काउंटनंतर फक्त २६,९९० रुपयांमध्ये मिळत आहे. जर तुम्ही जुना डिवाइस एक्सचेंज केला तर सुमारे १२ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. यात दमदार परफॉर्मन्ससाठी Intel Celeron N4120 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि मोठा १४ इंचाचा डिस्प्ले लॅपटॉपमध्ये मिळतो.

ASUS Chromebook Flip Celeron Dual Core

आसूसनं यात Intel Celeron Dual Core N4020 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB LPDDR4 RAM आणि 32GB EMMC स्टोरेज देण्यात आली आहे. यात एक ११.६ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत एक यूएसबी ३.२ जेन १ पोर्ट, २ यूएसबी ३.२ पोर्ट आणि एक टाइप सी पोर्ट मिळतो.

Lenovo IdeaPad 1 Intel Celeron Laptop

लेनोवोचा हा २-इन-१ लॅपटॉप फ्लिपकार्ट वरून ३० टक्क्यांपेक्षा जास्त डिस्काउंटनंतर फक्त २२,१०० रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात Intel Celeron प्रोसेसर व्यतिरिक्त १०.१ इंचाचा टच-स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा लॅपटॉप Windows 10 Home सह येतो आणि सोबत 4GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते.

Chuwi FreeBook 13.5 Inch 2 in 1 Laptop

टच-स्क्रीन असलेला हा लॅपटॉप Amazon आणि Flipkart दोन्ही प्लॅटफॉर्मवरून ४० टक्के डिस्काउंटनंतर २९,९९० रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात १३.५ इंचाचा टच-स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे आणि Core i3-121U प्रोसेसर मिळतो. तसेच 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा मजबूत बिल्ड-क्वॉलिटी आणि हलक्या डिजाइनसह येतो.

Source link

best 2 in 1 laptopsbest convertible 2 in 1 laptops under 30000best convertible laptopschromebookलॅपटॉप
Comments (0)
Add Comment