भारतातील Xiaomi फोन्समध्ये होणार मोठा बदल; अगदी नव्यासारखे होतील ‘हे’ मॉडेल

Xiaomi नं भारतीय युजर्ससाठी आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे, ज्याचे नाव HyperOS आहे. जी खासकरून पर्सनल डिवाइस, कार आणि स्मार्ट होम प्रोडक्टसाठी डिजाइन करण्यात आला आहे. ही ओएस आल्यामुळे डिवाइसची कनेक्टिव्हिटी आणि सिक्योरिटी सुधारेल. तसेच प्रोसेसिंग स्पीड देखील फास्ट होईल. तसेच युजर्सचा एक्सपीरियंस देखील चांगला होईल. चला जाणून घेऊया नवीन OS आणि याला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्स बाबत…

मिळतील नवीन आयकॉन आणि फॉन्ट्स

कंपनीनुसार, Xiaomi HyperOS कोणतंही काम झटकन पूर्ण करू शकते. यातील रिअ‍ॅक्शन टाइम इतर ओएसच्या तुलनेत 14 टक्के कमी आहे. ही कमी स्टोरेजचा वापर करते. यात नवीन डिजाइन असलेला कंट्रोल सेंटर आणि लॉक स्क्रीन मिळेल, हे युजर कस्टामाइज करू शकतात.

नवीन ओएस मध्ये 600 भाषांच्या फॉन्टसह 20 राइटिंग स्टाइल आणि 1 लाख Glyphs देण्यात आले आहेत. यात रिडिजाइन्ड वेदर अ‍ॅप्लिकेशन आणि नवीन आयकॉन देखील मिळतील. या सर्व अपडेशनमुळे फोनचा लुक पूर्णपणे बदलून जाईल. तसेच नवीन ओएसवर काम करणारे डिवाइस शाओमी स्मार्ट हब, हायपर माइंड, एन्ड-टू-एन्ड सिक्योरिटी आणि वन स्मार्ट इको सिस्टमला सपोर्ट करतील.

मार्चमध्ये या फोन्सना मिळेल अपडेट

  1. Xiaomi 12 Pro
  2. Redmi Note 13 Pro +
  3. Redmi Note 13 Pro
  4. Redmi Note 13
  5. Redmi Note 12 Pro +
  6. Redmi Note 12 Pro
  7. Redmi Note 12

दुसऱ्या तिमाहीत या डिवाइसवर येईल नवीन ओएस

  1. Xiaomi 11 Ultra
  2. Xiaomi 11T Pro
  3. Mi 11X
  4. Xiaomi 11i HyperCharge
  5. Xiaomi 11 Lite
  6. Xiaomi 11i
  7. Mi 10
  8. Xiaomi Pad 5
  9. Redmi 13C Series
  10. Redmi 12
  11. Redmi Note 11 Series
  12. Redmi 11 Prime 5G
  13. Redmi K50i

या स्मार्टफोन आणि टॅबला मिळाला आहे नवीन OS

  1. Xiaomi 13 Pro
  2. Xiaomi Pad 6
  3. Redmi 12 5G
  4. Redmi 12C
  5. Redmi 11 Prime
  6. Redmi Pad

Xiaomi 14 येतोय बाजारात

स्मार्टफोन ब्रँड शाओमी ७ मार्चला आपला फ्लॅगशिप डिवाइस Xiaomi 14 लाँच करणार आहे. हा युरोपमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.36 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा Dolby Vision आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. LEICA ब्रँडिंग असलेला 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जबरदस्त परफॉर्मन्ससाठी शाओमी 14 मध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर मिळतो. यात 4610mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Source link

hyperosxiaomi hyperosxiaomi hyperos indiaशाओमीशाओमी हायपरओएस ​अपडेट
Comments (0)
Add Comment