फक्त ६,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला 6000mAh बॅटरी असलेला फोन; फ्लिपकार्टवर सुरु होणार विक्री

इंफिनिक्सनं आपल्या स्मार्ट ८ सीरीजचा भारतात विस्तार केला आहे. यात Infinix Smart 8 Plus मोबाइल लाँच करण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये युजर्सना ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, ६०००एमएएचची मोठी बॅटरी, ४जीबी एक्सटेंडेड रॅमसह ८जीबी पर्यंत रॅम सपोर्ट, ५० मेगापिक्सल कॅमेरा सेटअप सारखे अनेक स्पेसिफिकेशन्सची मिळत आहेत. चला, जाणून घेऊया मोबाइलची किंमत आणि संपूर्ण माहिती.

Infinix Smart 8 Plus ची किंमत आणि उपलब्धता

Infinix Smart 8 Plus मोबइल भारतात ४जीबी रॅम + १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला सिंगल मॉडेलमध्ये आला आहे. डिवाइसची किंमत फक्त ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ६,९९९ रुपये किंमत लाँच ऑफर अंतगर्त ठेवण्यात आली आहे. तर फोनची विक्री येत्या ९ मार्चपासून दुपारी १२:०० वाजता फ्लिपकार्ट आणि प्लॅटफॉर्मवर सुरु होईल.
हे देखील वाचा: चायनीज कंपन्यांना टक्कर देत आहे एकमेव भारतीय ब्रँड; लाँच पूर्वीच वेबसाइटवर लिस्ट झाला नवीन फोन

Infinix Smart 8 Plus चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्ट ८ प्लस मध्ये timber texture प्रीमियम डिजाइन फिनिश मिळते. बॅक पॅनलवर चांगला ड्युअल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश आहे. कलर ऑप्शन पाहता हा गॅलेक्सी व्हाइट, टिम्बर ब्लॅक आणि शाइनी गोल्ड सारख्या तीन कलरमध्ये उपलब्ध होईल.

स्मार्ट ८ प्लस मध्ये ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला ६.६ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले पॅनल मिळतो. यात पंच-होल डिजाइन आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला इनोव्हेटिव्ह मॅजिक रिंगचा सपोर्ट देखील आहे. ज्याच्या मदतीनं बॅटरी टक्के, चार्जिंग स्टेट्स आणि इन-कॉल टाइम सारखी माहिती मिळते.

स्मार्ट ८ प्लस मध्ये मीडियाटेक हेलियो जी३६ २.२ गीगाहर्ट्झ ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेज, मेमफ्यूजन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ८ जीबी पर्यंत रॅम आणि २टीबी पर्यंत मायक्रो एसडी स्लॉटचा सपोर्ट मिळत आहे. Infinix Smart 8 Plus मोबाइल फोन अँड्रॉइड १३ गो आधारित XOS १३ वर चालतो.

कॅमेरा फीचर्स पाहता Infinix Smart 8 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि AI लेन्स क्वॉड LED फ्लॅशसह मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी या स्वस्त इनफिनिक्स मोबाइलमध्ये ६०००एमएएचची बॅटरी आहे. जी चार्ज करण्यासाठी १८वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ही बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टनं चार्ज केली जाऊ शकते. इतर फीचर्स पाहता Infinix Smart 8 Plus फोन ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ, ३.५mm हेडफोन जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या ऑप्शनसह आला आहे.

Source link

6000mah battery phone6000mah battery phone infinix smart 8 plusinfinix smart 8 plusइनफिनिक्स६०००एमएएच बॅटरी फोन
Comments (0)
Add Comment