हायलाइट्स:
- मुंबईत लसीकरण मोहिमेला जोर
- करोनाच्या बुस्टर डोसची चर्चा
- राजकारण्यांनी घेतला बुस्टर डोस
मुंबईः करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना संसर्गापासून आणि विशेषतः डेल्टा व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी करोना लसीच्या तिसऱ्या बुस्टर डोसची घेण्याकडे अनेकांचा कल वाढतोय. मुंबईतही काही आरोग्य कर्मचारी, राजकारणी आणि त्यांच्या कर्मचार्यांनी करोना लसीचा तिसरा डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भात वृत्त दिलं आहे. (Coronavirus Booster Dose)
लसीचे दोन डोस घेऊनही करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळं पाश्चिमात्य देशांत तिसरा डोस देण्यात येत आहे. यालाच बुस्टर डोस म्हणतात. मात्र, लसीच्या बुस्टर डोसबाबत तज्ज्ञांमध्ये मत- मतांतरे आहे. केंद्र सरकारनेही बुस्टर डोसबाबत सावध पावलं उचलली आहेत. मात्र, मुंबईतील काही रुग्णालयात करोना लसीचा बुस्टर डोस दिला जात असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
वाचाः मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाचला योजनांचा पाढा; विरोधकांना लगावला टोला
टाइम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील काही रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा तिसरा डोस घेतला आहे. मात्र, यावेळी को-विन अॅपवर रजिस्ट्रेशन न करता किंवा वेगवेगळ्या फोनवरुन रजिस्टर करुन लसीचा तिसरा डोळ मिळवला आहे.
वाचाः … तर एक एकर शेती बक्षीस म्हणून देणार; शेतकऱ्याची घोषणा
तिसरा डोस घेण्यापूर्वी अनेकांनी अँटीबॉडीजची पातळी तपासली. तिसरा डोस घेणाऱ्यांमध्ये बहुतांश डॉक्टर्स आहेत. यांचे फेब्रुवारीमध्ये दोन डोस पूर्ण झाले होते. तपासणीमध्ये शरिरातील अँटिबॉडीज पातळी कमी झाल्यानं त्यांनी तिसरा डोस घेतला. यामध्ये एक युवा राजकारणी, त्याची पत्नी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा बुस्टर डोस घेतला होता.
वाचाः ‘सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल’