Pebble Royale ची किंमत आणि उपलब्धता
नवीन पेबल रोयाल स्मार्टवॉचची किंमत ४,२९९ रुपये ठेवण्यात आली आहे. पेबल स्मार्टवॉच कंपनीच्या के ऑनलाइन स्टोरवरून व्हिस्की ब्राउन, कोबाल्ट ब्लू आणि पाइन ग्रीन रंगात खरेदी केलं जाऊ शकतं.
हे देखील वाचा:
Pebble Royale चे फीचर्स
पेबल रोयालमध्ये लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅप ऑप्शनसह एक वर्तुळाकार स्टेनलेस स्टील डायल आहे. या पेबल स्मार्टवॉचमध्ये अनेक वॉच फेस सह १.४३-इंचाचा वर्तुळाकार AMOLED ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे. कंपनीनं या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट दिला आहे आणि यात बिल्ट-इन व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट देखील आहे.
स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यावर ५ दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ मिळते. पेबल रोयाल मध्ये हेल्थ ट्रॅकिंग सुविधा देण्यात आली आहे. यात हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 सेन्सर, स्लिप मॉनिटर, स्मार्ट कॅल्युक्युलेटर आणि एक स्टेप पेडोमीटरचा समावेश आहे. तसेच या स्मार्टवॉचमध्ये टायमर, वर्ल्ड क्लॉक, टॉर्च आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे.
विविध फिटनेस अॅक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी स्मार्टवॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. ज्यात चालणे, धावणे, सायकलिंग आणि इतर अनेक अॅक्टिव्हिटीजचा समावेश करण्यात आला आहे. पेबल रोयाल स्मार्टवॉच पाणी आणि धुळीपासून देखील सहज वाचू शकतो, कारण याला आयपी६७ रेटिंग देण्यात आली आहे.
Pebble Royale देणार या स्मार्टवॉचेसना टक्कर
पेबल रोयाल स्मार्टवॉच एक प्रीमियम फिनिश देत आहे आणि हे जगातील सर्वात पातळ स्मार्टवॉच असल्याचा दावा केला जात आहे. याच किंमतीत बाजारात अनेक ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत. ज्यात फायर-बोल्ट रोयाल स्मार्टवॉचचा समावेश आहे जे ४,३९९ रुपयांमध्ये खूप प्रीमियम लूक देतं आहे, तर अॅमेझॉनवर Amazfit Pop 3R ची किंमत ३,९९९ रुपये आहे. तसेच, १.७८-इंचाचा AMOLED डिस्प्ले असलेलं वनप्लस नॉर्ड वॉच ४,६९९ रुपयांमध्ये विकलं जात आहे.