अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे शहरात कडक निर्बंध; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

पुणे: करोना संसर्गामध्ये वाढ होऊ नये म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद राहणार असली तरी हॉटेल आणि रेस्टॉरण्ट सुरूच राहतील. करोना नियंत्रणात आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर काय होणार माहिती नाही. परिस्थिती आटोक्यात राहिली, तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत निर्बंध जैसे थे राहतील. परिस्थिती सुधारल्यास २ ऑक्टोबरपासून पुण्यातील निर्बंधांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

  • सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिकला बंदी. सिंहगडावर जाण्यासाठी ई व्हेइकल सुरू केल्या जाणार

  • माण आणि हिंजवडी भागातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही कामं होणार. पोलीस ठाणे आणि कचरा डेपोसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

  • महापालिका निवडणूक एक सदस्य की दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने करायची, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मागील बैठकीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यामुळे निर्णय होऊ शकला नाही.

  • आज जीएसटी परिषद लखनौमध्ये होत आहे. मला तिथे जाणे गैरसोयीचे होते. त्यामुळे व्हीसीद्वारे बैठक घ्या, अशी विनंती केली होती. जमणार नसेल तर प्रतिनिधी पाठवा, असे केंद्र सरकारने सुचविले होते. त्यानुसार प्रतिनिधी गेले आहेत. तसेच सूचना आणि मागण्या पत्राद्वारे कळविल्या आहेत.

  • पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटी मध्ये समावेश करण्यास राज्य सरकारचा विरोध आहे.

Source link

Ajit Pawar in PuneAnant Chaturdashi 2021pune news todayअजित पवारपुणे
Comments (0)
Add Comment