Netflix नेही आता ग्राहकांसाठी आणखी एक उपयुक्त फीचर आणले आहे. या फीचरचा वापर करून युजर्स आपला आवडता टीव्ही शो किंवा मूव्ही डाउनलोड करून ऑफलाइन पाहू शकतात. फक्त पाच सोप्या स्टेप्स फॉलो करून Netflix वरून टीव्ही शो किंवा मूव्ही कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देत आहोत.
हे देखील वाचा:
पायरी 1: Netflix लाँच करा आणि कंटेंट निवडा
तुमच्या डिव्हाइसवर Netflix ॲप ओपन करा. आता तुम्हाला डाउनलोड करायची असलेली टीव्ही मालिका किंवा चित्रपट निवडा. त्याचे डिटेल पेज पाहण्यासाठी टायटलवर टॅप करा.
पायरी 2: डाउनलोड चिन्ह शोधा
निवडलेल्या टायटलच्या माहिती पृष्ठावर (इन्फॉर्मशन पेज ) डाउनलोड (खालच्या दिशेने असलेला बाण) चिन्ह शोधा. हे चिन्ह सूचित करते की, तुम्ही निवडलेला ऑप्शन डाउनलोडसाठी तयार आहे. चिन्ह गहाळ असल्यास, याचा अर्थ विशिष्ट चित्रपट किंवा शो डाउनलोड केला जाऊ शकत नाही.
पायरी 3: डाउनलोड सुरू करा
डाउनलोड प्रक्रिया सुरू करण्यासाठी डाउनलोड चिन्हावर टॅप करा. तुम्हाला डाउनलोड लेव्हल जसे की, हाय किंवा स्टॅंडर्ड निवडण्यास सूचित केले जाईल. ते तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जवर अवलंबून असते.
पायरी 4: डाउनलोड स्थितीचे निरीक्षण करा
Netflix ॲपच्या “डाउनलोड” विभागात तुमच्या डाउनलोडची स्थिती तपासा. कन्टीन्यु आणि फास्ट डाउनलोड करण्यासाठी तुमचे डिव्हाइस स्थिर इंटरनेट कनेक्शनशी कनेक्ट केलेले असल्याची खात्री करा.
पायरी 5: डाउनलोड केलेल्या ऑप्शनमध्ये प्रवेश करा
एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यावर, तुम्ही डाउनलोड केलेले चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये प्रवेश करण्यासाठी Netflix ॲपमधील “डाउनलोड” विभागात नेव्हिगेट करा. येथे, तुम्हाला ऑफलाइन पाहण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व ऑप्शन्स मिळतील.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, Netflix वर डाउनलोड केलेले ऑप्शन्स एक्सपायरी डेटसह येतात. Netflix सामान्यत: 30 दिवसांसाठी डाउनलोड ठेवण्याची परवानगी देते, हा कालावधी 48 तासांपासून 30 दिवसांपर्यंत वेगवेगळा असू शकतो. तुम्ही तुमचे Netflix खाते रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास, डाउनलोड केलेले सर्व मटेरियल तुमच्या डिव्हाइसवरून काढून टाकले जाईल. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या मेंबरशीपचे रिन्यूएशन केल्यास, तुम्हाला ते मटेरियल पुन्हा डाउनलोड करावे लागेल. या सोप्या पायऱ्यांसह, तुम्ही तुमच्या आवडत्या Netflix चित्रपटांचा आणि टीव्ही शोचा कधीही, कुठेही, इंटरनेट कनेक्शनशिवाय आनंद घेऊ शकता. तेंव्हा या स्टेप्स फॉलो करून तुमचा मनोरंजनाचा आनंद व्दिगुणीत करा .