Samsung Galaxy A05 ची नवीन किंमत
Samsung Galaxy A05 च्या ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत लाँचच्या वेळी ९,९९९ रुपये होती. परंतु आता याच्या किंमतीत १३०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या प्राइस कटनंतर हा मॉडेल ८,६९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच, याच्या ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलच्या किंमतीत २००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. जो आता १०,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा १२,९९९ रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता.
Samsung Galaxy A05 चे स्पेसिफिकेशन
सॅमसंग गॅलेक्सी ए०५ लाइट ग्रीन, ब्लॅक आणि सिल्व्हर कलरमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी-यू एचडी प्लस डिस्प्ले आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये ८एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर मागे ५०एमपीचा मुख्य आणि २एमपीचा डेप्थ सेन्सर मिळतो.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. स्मूद फंक्शनिंगसाठी मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हेलीयो जी८५ प्रोसेसर, ६जीबी रॅम आणि १२८जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते.
सॅमसंगच्या या बजेट मोबाइलमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी २५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील देण्यात आला आहे.
सॅमसंग रिंग
सॅमसंगनं गेल्या महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या मोबाइल वर्ल्ड कांग्रेस इव्हेंटमध्ये आपली पहिली गॅलेक्सी रिंग सादर केली होती. यात अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीनं युजर्स आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतील. परंतु कंपनीनं आतापर्यंत रिंग खरेदीसाठी कधी येणार आणि किंमत किती असेल, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.