Oppo Watch X ची किंमत
Oppo Watch X मार्स ब्राउन आणि प्लॅटेनियम ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टवॉचची किंमत सिंगल ब्लूटूथ व्हेरिएंटसाठी MYR १,३९९ (जवळपास २४,५०० रुपये) ठेवण्यात आली आहे. हे ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर सेलसाठी लिस्ट करण्यात आलं आहे. आतापर्यंत हे फक्त मलेशियामध्ये लाँच करण्यात आलं आहे आणि भारतात वनप्लस वॉच २ असल्यामुळे हे वॉच येण्याची शक्यता कमी आहे.
हे देखील वाचा:
Oppo Watch X चे स्पेसिफिकेशन
Oppo च्या नवीन स्मार्टवॉचमध्ये ४६६ x ४६६ पिक्सल रिजॉल्यूशन असलेला १.४३ इंचाचा गोल AMOLED डिस्प्ले मिळतो, जो १,००० नीट्स पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. ही २.५डी सॅफायर क्रिस्टल स्क्रीन आहे. Oppo Watch X मध्ये २जीबी रॅम आणि ३२जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते.
हेल्थ फीचर्स पाहता, Oppo Watch X संपूर्ण दिवसभराच्या स्लिप ट्रॅकिंगला सपोर्ट करतं, स्लिप क्वॉलिटी, झोपेतील श्वसन प्रक्रिया, झोपेतील घोरणे आणि इतर अनेक गोष्टींवर लक्ष ठेवतं. तसेच यात हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सीजन (SpO2) ट्रॅकरसह डेली अॅक्टिव्हिटी रिमाइंडर देखील आहेत. फिटनेस ट्रॅकिंगसाठी यात १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड, सहा प्रकारच्या कार्डियो मशीन रिकॉग्निशन, प्रोफेशनल स्पोर्ट्स मोड, इत्यादी आहेत.
ओप्पो वॉच एक्समध्ये ५००एमएएच बॅटरी आहे आणि दावा करण्यात आला आहे की हे वॉच ६० मिनिटांत शून्य ते १०० पर्यंत चार्ज करता येतं . तसेच हेवी युज करून देखील हे ४८ तासपर्यंतची बॅटरी लाइफ देऊ शकतं, स्मार्ट मोड मध्ये १०० तासांपर्यंत बॅटरी लाइफ आणि पावर सेवर मोडमध्ये १२ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.