या फीचरला Air Gesture असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स कोणत्याही फिजिकल कॉन्टॅक्ट विना फोनमध्ये नेव्हीगेट करू शकतील. हे फिचर १० पेक्षा जास्त जेस्चर्सना सपोर्ट करेल. या फीचरमुळे स्मार्टफोन वापरणे सोपं जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की हे फीचर खासकरून व्हिडीओ संबंधित अॅपसह थर्ड-पार्टी अॅप्लिकेशनवर देखील वापरता येईल. उदा. युजर्स एखादा व्हिडीओ लाइक करण्यासाठी आपला अंगठा वर करू शकतात.
हा स्मार्टफोन गेल्यावर्षी सादर केलेल्या Narzo 60 Pro 5G ची जागा घेईल. याची डिजाइन फ्लॅट डिस्प्ले आणि स्लिम बेजल्ससह येईल. यात फ्रंट कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आली आहे. याची विक्री ई-कॉमर्स साइट Amazon च्या माध्यमातून होईल. Realme नं दाखवलेल्या टीजर्समध्ये या स्मार्टफोनच्या उजवीकडे पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर्स आहेत. यात सर्कुलर शेप असलेला कॅमेरा दिसत आहे. या स्मार्टफोनमध्ये १/१.५६ इंच सोनी आयएमएक्स८९० प्रायमरी सेन्सर असेल. कंपनीचा दावा आहे की २०,००० रुपयांपेक्षा कमीच्या सेगमेंटमध्ये हा कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्समध्ये याचा समावेश आहे. अॅमेजॉननं Narzo 70 Pro 5G साठी एक वेबपेज पब्लिश केलं आहे. यात प्रोसेसर म्हणून MediaTek चा Dimensity 7050 चिपसेट असू शकतो.
गेल्यावर्षी सादर केलेल्या Realme Narzo 60 Pro 5G च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. यात ६.७ इंचाचा फुल एचडी+ (१,०८० x २,४०० पिक्सल) अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० ५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा यूनिटमध्ये १०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यात ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ६७ वॉट सुपरवुक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.