GPD Win Mini 2024
या लेटेस्ट विन मिनी मध्ये Ryzen 7 8840U किंवा Ryzen 5 8640U प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यात आता ८ Zen4 कोर मिळतात. त्यामुळे लॅपटॉपला जास्त स्पीड तर मिळतोच तसेच गेम्स आणि इतर कामे करण्यासाठी जास्त पावर देखील मिळते. AMD च्या XDNA एआय कोर टेक्नॉलॉजीची जोड दिल्यामुळे कम्प्युटिंग परफॉर्मन्स सुधारेल अशी अपेक्षा आहे.
या मॉडेलच्या डिस्प्ले मध्ये बरीच सुधारणा करण्यात आली आहे. जो सर्वात मोठा बदल असल्याचं म्हटलं जातंय. यात आता ७ इंचाचा डिस्प्ले मिळतो, जी एक १०८० पिक्सल रिजोल्यूशन असलेली एलटीपीएस स्क्रीन आहे. ही स्क्रीन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. तसेच यात फ्री सिंक प्रीमियम आणि व्हेरिएबल रिफ्रेश रिफ्रेश रेट मिळतो. या डिस्प्लेला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीनं गोरिल्ला ग्लास ६ कोटिंगचा वापर केला आहे.
यंदाच्या मॉडेलमध्ये OCuLink पोर्ट मात्र कंपनीनं दिला नाही, जो याआधीच्या मॉडेल मध्ये होता. या पोर्टचा वापर करून एक्सटर्नल जीपीयू जोडता येत होता, परफॉर्मन्समध्ये सुधार करता येत होता. त्याऐवजी आता युजर्सना यातील USB4 केनेक्शनचा वापर करावा लागेल. हा डिवाइस PlayStation 3 गेम्स इम्युलेट करण्याचे काम चांगल्याप्रकारे करतो, असं सांगण्यात आलं आहे, ज्यात 60 FPS मिळतो. हे करण्यासाठी यातील AVX-512 इंस्ट्रक्शनची मदत होते, असा दावा करण्यात आला आहे.
GPD Win Mini 2024 ची किंमत
Win Mini 2024 एका क्राउड फंडिंग कॅम्पेनच्या माध्यमातून लाँच केलं जात आहे. ज्याची किंमत ८७९ डॉलर्सपासून सुरु होते, ही किंमत सुमारे ७३ हजार भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. या बेस मॉडेलमध्ये Ryzen 7 8840U प्रोसेसर, 32GB RAM मिळतो. सोबत 512GB किंवा 2 TB SSD स्टोरेज मिळवण्याचा पर्याय देखील आहे.