‘फ्रेंड्स मॅप’ फीचरची बातमी लीक
मोबाईल डेव्हलपर ॲलेसँड्रो पलुझी यांनी एका X पोस्टमध्ये Instagram वर मित्रांचा नकाशा असलेल्या ‘फ्रेंड्स मॅप’ फीचरबद्दलची बातमी लीक केली आहे. या फीचरच्या साह्याने इन्स्टाग्राम युजर्सना त्यांचे मित्र प्लॅटफॉर्मवर काय शेअर करत आहेत हे शोधण्याची परमिशन मिळेल. यामध्ये युजर्स केवळ मॅपसाठी नोट्स सोडू शकतात जे त्यांचे मित्र पाहू शकतात. लोकेशन टॅग असलेली कोणतीही गोष्ट मॅपवर देखील दिसेल. हे फीचर युजर्सना ते ज्या मित्रांबरोबर कन्टेन्ट शेअर करू इच्छितात त्यांना सिलेक्ट करण्याचा ऑप्शनदेखील देईल.
सिलेक्टड कॉन्टॅक्टस सोबत लोकेशन शेअरिंग
स्नॅपचॅटवर, युजर्स स्नॅप मॅपमध्ये जाऊ शकतात आणि लोकेशननुसार त्यांच्या मित्रांच्या ॲक्टिव्हिटी पाहू शकतात. तथापि, इन्स्टाग्रामवरील ‘फ्रेंड्स मॅप’ त्याचप्रकारे काम करेल की नाही याबद्दल माहिती मिळालेली नाही. इंस्टाग्रामनुसार, युजरचे लोकेशन एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल. तुमचे शेवटचे ॲक्टिव्ह लोकेशन कोण पाहू शकेल हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही सेटिंग्जमध्ये बदल करू शकता. जेव्हा तुम्ही Instagram उघडाल तेव्हाच तुमचे लोकेशन अपडेट होईल.”
‘मेटा’ चे अजून काम सुरु
पलुझीने प्रथम नोव्हेंबरमध्ये इंस्टाग्रामवर फ्रेंड्स मॅपबद्दलचे डीटेल्स शेअर केले. ‘मेटा’ कंपनी मात्र हे फीचर लोकांसमोर आणण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांवर अजूनही काम करत असल्याचे दिसते आहे. तथापि, इन्स्ट्राग्रामवर ‘फ्रेंड्स मॅप फीचर’ येण्याबद्दलची सर्व माहिती अजून तरी अनधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. त्यामुळे जोपर्यंत ‘मेटा’कडून याची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आपण वाट पहिली पाहिजे.
‘व्हॉटसॲप’वर नवीन फीचर लाँच
‘मेटा’च्या इतर डेव्हलपमेन्टकडे बघितल्यास इन्स्ट्राग्रामचे सिस्टर ‘व्हॉटस ॲप’वर एक नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे. या फीचर मध्ये फोनच्या लॉक स्क्रीनवरही त्वरित ‘ब्लॉक’ व ‘रिपोर्ट स्पॅम’ करण्याची सुविधा असेल. यामध्ये २ स्टेप ॲक्टिव्हिटी येईल.
स्टेप १ – लॉक स्क्रीनवरील मेसेज जास्त वेळ प्रेस करा आणि युजरला याठिकाणी रिप्लाय ऑप्शनव्यतिरिक्त एक नवीन ‘ब्लॉक’ हा ऑप्शन मिळेल.
स्टेप २- युजर फक्त ब्लॉक बटणावर क्लिक करू शकतो आणि आवश्यक असल्यास, तो/ती पुढील गोष्टींना फॉलो करून WhatsApp वर तक्रार करू शकतात.