corona latest update: दिलासा! राज्यात आज नव्या करोना रुग्णांची संख्या घटली; मात्र ‘ही’ चिंताही

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ५८६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ४१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली झाली आहे. मात्र मृत्यूची संख्या वाढल्याने ही स्थिती चिंता वाढवणारी आहे. तर, दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे.राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ५८६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ५९५ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २४० इतकी होती. तर, आज ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४५ इतकी होती. (maharashtra registered 3586 new cases in a day with 4410 patients recovered and 67 deaths today)

आज राज्यात झालेल्या ६७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख २० हजार ३१० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुखांची आर्थिक नाकेबंदी; प्राप्तीकर विभागाकडून बँक खाती सील

राज्यातील सक्रिय रुग्णांची स्थिती

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४८ हजार ४५१ इतकी आहे. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ४३२ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ७ हजार २४० आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ३ हजार ६१६ वर खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ६ हजार ६०७ अशी आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार ४६८ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ३९७ इतकी किंचित घटली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरून चर्चा; बाळासाहेब थोरात म्हणाले…

मुंबईत उपचार घेत आहेत ५,५०२ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ५०२ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ९९१ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७३२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९४६ इतकी आहे.

धुळे, वाशिम जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ३५८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९८ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९७ वर आली आहे. तर नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी दोन सक्रिय रुग्ण आहेत. ही राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवेंच्या शिवसेनेत येण्याच्या चर्चेबाबत जयंत पाटील म्हणाले…

२,८९,४२५ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६५ लाख २९ हजार ८८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ११ हजार ५२५ (११.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८९ हजार ४२५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

corona updatescoronavirus in maharashtraCoronavirus latest updatescovid-19करोनाकरोना अपडेटकोविड-१९महाराष्ट्रातील करोनाची स्थिती
Comments (0)
Add Comment