‘एअरटेल’ सिम हरवले की चोरीला गेले? बघा कसे करायचे त्वरित ब्लॉक

तुमचे ‘एअरटेल’ सिम हरवले किंवा चोरीला गेले तरी तुमच्या मोबाईल नंबरचा कोणताही गैरवापर टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. चोरी झालेले किंवा हरवलेले सीम कार्ड त्वरित ब्लॉक करून त्याचा पुढील गैरवापर कसा थांबवायचा याची माहिती घेऊया .

नॉन-एअरटेल मोबाइल नंबर वापरून ‘एअरटेल’ सिम करा ब्लॉक

Jio, Vi किंवा BSNL मोबाईल नंबर वापरून हरवलेले किंवा चोरीला गेलेले ‘एअरटेल’ सिम कसे ब्लॉक करायचे ते बघूया.

  • स्टेप 1: Jio, Vi किंवा BSNL मोबाईल नंबर असलेल्या कोणत्याही फोनचा डायलर उघडा.
  • स्टेप 2: आता 9849098490 किंवा 18001034444 डायल करा आणि ‘कॉल’ आयकॉन दाबा.
  • स्टेप 3: कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी बोलण्याचा पर्याय निवडा.
  • स्टेप 4: तुम्ही एक्झिक्युटिव्हशी कनेक्ट झाल्यावर, त्यांना तुमचा Airtel मोबाइल नंबर देवून तुमचे Airtel सिम कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.
  • स्टेप 5: तुमची ओळख आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जाईल आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी पुढे जाईल.

‘एअरटेल’ मोबाइल नंबर वापरून ‘एअरटेल’ सिम करा ब्लॉक

तुमचा किंवा इतर कोणाचा पर्यायी ‘एअरटेल’ मोबाइल नंबर वापरून सिम कसे ब्लॉक करायचे याची माहिती घेऊया.

  • स्टेप 1: ‘एअरटेल’ सिम कार्ड असलेला फोन घ्या आणि डायलर ॲप उघडा.
  • स्टेप 2: आता 198 किंवा 121 डायल करा आणि ‘कॉल’ आयकॉन दाबा.
  • स्टेप 3: कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी बोलण्याचा पर्याय निवडा.
  • स्टेप 4: तुम्ही एक्झिक्युटिव्हशी कनेक्ट झाल्यावर, त्यांना तुमचा Airtel मोबाइल नंबर देवून तुमचे Airtel सिम कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.
  • स्टेप 5: तुमची ओळख आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जाईल आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी पुढे जाईल.
  • या प्रक्रियेद्वारे तुमचे ‘एअरटेल’ सिम कार्ड लवकरच ब्लॉक केले जाईल.

‘एअरटेल थँक्स ॲप’ वापरून ‘एअरटेल’ सिम ब्लॉक करा

तुमचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले ‘एअरटेल’ सिम कार्ड ब्लॉक करायचे असल्यास ‘एअरटेल थँक्स ॲप’ हाही एक पर्याय आहे. थँक्स ॲप वापरून कार्ड ब्लॉक करायचे असल्यास, ते कसे करायचे याची माहिती देत आहोत.

  • स्टेप 1: सर्वप्रथम, तुमच्या फोनवर ‘एअरटेल थँक्स ॲप’ उघडा. तुमच्या Airtel मोबाईल नंबरने आधी लॉग इन केले असल्याची खात्री करा.
  • स्टेप 2: आता ॲपमधील ‘हेल्प ‘ सेक्शनमध्ये जा आणि ‘लाइव्ह चॅट सपोर्ट’ शोधा.
  • स्टेप 3: स्क्रीनवर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि ‘एअरटेल’ सिम ब्लॉक केले जाईल.

ईमेल पाठवून करा ‘एअरटेल’ सिम ब्लॉक

‘एअरटेल’चे हरवलेले किंवा चोरीला गेलेले सिम ब्लॉक करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे संबंधित मजकूर तयार करून थेट Airtel ला मेल पाठवणे. त्याची प्रक्रिया पाहूया .

  • स्टेप 1: तुमच्या फोनवर ईमेल ॲप उघडा किंवा वेब ब्राउझरवर तुमच्या ईमेल अकाउंटवर लॉग इन करा.
  • स्टेप 2: आता एक नवीन ईमेल तयार करा आणि रिसीव्हर म्हणून 121@in.airtel.com हा मेल ऍड्रेस ठेवा.
  • स्टेप 3: तुमचे ‘एअरटेल’ सिम हरवल्याचे किंवा चोरी झाल्याचे स्पष्ट करा आणि त्यांना लवकरात लवकर हरवलेले सिम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा.
  • स्टेप 4: Airtel एक्झिक्युटिव्ह तुम्हाला योग्य रिझोल्यूशनसह रिप्लाय देईल आणि तुमचे सिम ब्लॉक केले जाईल.

तुम्हाला तुमचे ‘एअरटेल’ सिम ब्लॉक करण्यासाठी कोणत्याही ऑनलाइन पद्धतींचा वापर करायचा नसेल, तर जवळपासच्या ‘एअरटेल’ स्टोअरला भेट द्या आणि तेथील अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.

‘एअरटेल कॉर्पोरेट सिम कार्ड’ कसे ब्लॉक करावे.

कॉर्पोरेट-आधारित एअरटेल सिम कार्ड गमावल्यास किंवा चुकीच्या ठिकाणी सिम कार्ड चुकीच्या हातात पडल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. ‘एअरटेल कॉर्पोरेट सिम कार्ड’ कसे ब्लॉक करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती येथे देत आहोत.

  • स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या कॉर्पोरेट मॅनेजरला तुमचे ‘एअरटेल’ सिम हरवले असल्याची माहिती द्या .
  • स्टेप 2: त्यानंतर, मॅनेजरला सिम कार्ड नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधावा लागेल आणि सिम कार्ड ब्लॉकची विनंती करावी लागेल.
  • स्टेप 3: त्यानंतर, एक फॉर्म देखील भरणे आवश्यक आहे हा फॉर्म सिम कार्ड ॲडमिनिस्ट्रेटरद्वारे दिला जाईल. हा फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा.

Source link

Airtel customer careAirtel SIM blockairtel sim cardAirtel Thanks appएअरटेल थँक्स ऍपएअरटेल सिम ब्लॉक
Comments (0)
Add Comment