हायलाइट्स:
- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत.
- या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतला आढावा.
- ठाणे जिल्ह्यात करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांच्या सूचना.
ठाणे: राज्यात काही जिल्ह्यांमध्ये करोनाचे नविन रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज ठाण्यासह अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांचा आढावा घेतला. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच ठाणे जिल्ह्यात करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या. (as the number of new corona patients is increasing chief secretary of the state sitaram kunte suggested increasing vaccination)
दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्य सचिवांनी आज ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा येथील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला.
क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात आज नव्या करोना रुग्णांची संख्या घटली; मात्र ‘ही’ चिंताही
ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर दोन टक्क्यांहून कमी आहे. मात्र या जिल्ह्याच्या लगत असलेल्या मुंबईत रुग्णसंख्या काहीशी वाढत असून ठाणे जिल्ह्याने अधिक सतर्कता बाळगावी. चाचण्यांचे प्रमाण वाढवितानाच जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी महापालिका क्षेत्रात देखील रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.
क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुखांची आर्थिक नाकेबंदी; प्राप्तीकर विभागाकडून बँक खाती सील
करोनासोबतच काही जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर दिला पाहिजे. डास निर्मुलन मोहिम प्रभावीपणे राबविली पाहिजे, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरून चर्चा; बाळासाहेब थोरात म्हणाले…
यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अपर जिल्हाधिकारी वैदैही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आदी उपस्थित होते.