लहान भावाचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी घरातून निघाले; वाटेत दोघांनाही मृत्यूने गाठले!

हायलाइट्स:

  • दोघेही भावंडे अपघातात ठार
  • मुंबई-आग्रा महामार्गावर घडली दुर्घटना
  • घरातील कर्त्या मुलांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का

सिडको (नाशिक) : व्यसनमुक्तीच्या औषधोपचारासाठी गेलेली दोघेही भावंडे अपघातात ठार झाली आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर पांडवलेणी समोरील उड्डाणपूल इथं ही दुर्घटना घडली आहे.

लहान भावाला दारूचे व्यसन असल्याने त्याला घेऊन मोठा भाऊ त्याचं व्यसन सोडवण्याकरता दिंडोरी इथं गेला होता. दिंडोरीत औषध घेतल्यानंतर दुचाकीवरून घरी परतत असताना पांडवलेणी समोरील उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

IIT Student Commits Suicide: धक्कादायक! आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण..

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख लक्ष्मण जाधव ( ३५ ) व त्यांचा लहान भाऊ सोमनाथ लक्ष्मण जाधव ( २५ ) हे दोघे राहणार ( मुरंबी,ता. इगतपुरी) त्यांची दुचाकी ( एम एच १५ डी पी ४२१४ ) वरून सोमनाथचे दारूचे व्यसन सोडण्यासाठी वणी, दिंडोरी येथे शुक्रवारी सकाळी गेले होते. दरम्यान वणीहून परत येत असताना ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मुंबई आग्रा महामार्गावर पांडवलेणी समोर उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिली.

दरम्यान, जाधव बंधूंच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहिण असा परिवार आहे. घरातील कर्त्या मुलांच्या निधनाने जाधव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर मुरंबी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link

nashik accidentNashik newsनाशिकनाशिक अपघातनाशिक पोलीस
Comments (0)
Add Comment