गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर एरंडोल येथील २ पोलिस कर्मचार्यांना पदोन्नती

जिल्हा संपादक : शैलेश चौधरी

एरंडोल: येथील पोलीस स्टेशन चे पोलिस नाईक अनिल बबनराव पाटील-२७९७ व काशिनाथ नामदेव पाटील-२९४७ यांना गणेश चतुर्थी च्या दिवशी हवालदार पदावर बढती मिळाली आहे.


त्यामुळे त्यांना ‘गणपती पावला,असे बोलले जात आहे.
आमच्या आयुष्यात आम्हाला मिळालेली ही पदोन्नती म्हणजे गणपती ने दिलेला प्रसाद असून आमच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण ठरणार आहे असे त्यांनी यावेळी सांगीतले.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहीफळे व सहकारी कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अजित पवारअहमदनगरउद्धव ठाकरेभाजपमुंबईशिवसेना
Comments (0)
Add Comment