छोटयाश्या प्लॅनमध्ये मिळत आहे एक्सट्रा डेटा; अशी Vodafone Idea (Vi) ची ऑफर

भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली Vodafone Idea ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी सतत नवीन प्लॅन सादर करत असते. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विआय आपल्या जुन्या प्लॅन्समध्ये देखील बदल करत असते. तयामुळे आता पुन्हा एकदा कंपनीनं अशीच एक ऑफर आणली आहे. या ऑफर अंतगर्त युजर्सना प्लॅनमध्ये एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे. या प्लॅनची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. त्याचबरोबर प्लॅन तुम्हाला जुन्या किंमतीत एक्स्ट्रा बेनेफिट्स देत आहे. चला जाणून घेऊया प्लॅनची किंमत आणि बेनेफिट्स.

कंपनीची ऑफर पाहता Vodafone Idea (Vi) च्या या प्लॅनची किंमत ७५ रुपये आहे. हा कंपनीचा एक्स्ट्रा डेटा देणारा प्लॅन आहे. आता-पर्यंत कंपनी या प्लॅन अंतगर्त 6GB डेटा देते. तसेच, आता कंपनी यात २५ टक्के एक्स्ट्रा डेटा देत आहे. आता तुम्हाला ७५ रुपयांच्या रिचार्जवर 6GB ऐवजी 7.5GB डेटा मिळेल. विशेष म्हणजे Vodafone Idea च्या या डेटा प्लॅनमध्ये झालेला बदल दोनच सर्कलमध्ये करण्यात आला आहे. हे दोन सर्कल महाराष्ट्र व गोवा आहेत.

Vodafone Idea 75 Plan

बेनेफिट्स पाहता, Vodafone Idea च्या ७५ रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये तुम्हाला ७ दिवसांपर्यंतची व्हॅलिडिटी मिळते. ७ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह आधी या प्लॅनमध्ये तुम्हाला ६जीबी डेटा दिला जात होता. परंतु आता ऑफर अंतगर्त १.५जीबी एक्सट्रा डेटा दिला जात आहे. त्यामुळे या प्लॅनमध्ये आता ७.५जीबी डेटा वापरायला मिळेल.

वर सांगितल्याप्रमाणे वोडाफोन आयडियाचा हा डेटा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा व्यतिरिक्त इतर कोणतेही टेलीकॉम बेनेफिट्स मिळत नाही. यात कॉलिंग किंवा एसएमएस बेनेफिट्सचा समावेश करण्यात आलेला नाही. हा प्लॅन तेव्हाच जास्त उपयुक्त ठरेल जेव्हा तुमच्या मुख्य प्लॅनमधील हाय स्पीड डेटा लिमिट संपली असेल.

९८ रुपयांचा प्लॅन

कॉलिंगसाठी तुम्ही ९८ रुपयांच्या बजेट प्लॅनचा वापर करू शकता. या प्लॅनमध्ये १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या छोट्या प्लॅनमध्ये फक्त कॉलिंगच मिळत नाही तर डेटा बेनिफिट देखील देतो. वोडाफोन आयडियाचा हा प्लॅन युजर्सना आणि २००एमबी डेटाची सुविधा देखी देतो. परंतु या प्लॅनमध्ये SMS बेनेफिट्स मिळत नाहीत.

Source link

vodafone ideavodafone idea 75 planvodafone idea data boosterवीवोडाफोन आयडिया
Comments (0)
Add Comment