वी च्या मुंबईकर प्रीपेड ग्राहकांना मिळणार ई-सिम

वी ने मुंबईतील आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ई-सिम (eSIM) सेवा सुरु केल्याची घोषणा आज केली. कॉम्पॅटिबल स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच डिव्हाईसमध्ये ई-सिम वापरणाऱ्या वी प्रीपेड ग्राहकांना अधिक जास्त सुविधा आणि लवचिकतेचा अनुभव घेता येईल. ई-सिम एकाच डिव्हाईसवर अनेक वेगवेगळ्या प्रोफाईल्सना सपोर्ट करते, त्यामुळे प्रायमरी सिम न काढता दुसरे सिम कार्ड अगदी सहजपणे वापरता येऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे ई-सिम हे शाश्वततेच्या, पर्यावरणपूरकतेच्या दिशेने उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे, हे अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळवून देते तसेच याच्या साहाय्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा सहजपणे स्वीकार करता येतो. या लॉन्चमुळे प्रीपेड व पोस्टपेड असे सर्व वी ग्राहक त्यांच्या हॅन्डसेटवर ई-सिमचे लाभ घेऊ शकतील.

तुमच्या फोनवर वी ई-सिम (eSIM) मिळवण्यासाठी –

वर्तमान ग्राहक

  • “eSIM <space> registered email id” हा एसएमएस १९९ वर पाठवून प्रक्रिया सुरु करा.
  • जर तुमचा ईमेल आयडी वैध असेल तर तुम्हाला एक कन्फर्मेशन एसएमएस येईल. ई-सिम (eSIM) बदल विनंतीची पुष्टी करण्यासाठी मेसेज आल्यानंतर १५ मिनिटांच्या आत “ESIMY” हा मेसेज पाठवा.
  • तुम्ही कन्फर्मेशन मेसेज पाठवल्यानंतर, कॉलवर अनुमती देण्याची विनंती करणारा अजून एक एसएमएस तुम्हाला येईल.
  • कॉलवर अनुमती कळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक क्यूआर कोड येईल. सेटिंग्स>मोबाईल डेटा>अ‍ॅड डेटा प्लॅन याठिकाणी जाऊन तुम्हाला तो क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
  • आवश्यकता भासल्यास, सेकंडरी सिमसाठी डेटा प्लॅन लेबल रीनेम करा किंवा ही प्रक्रिया पुढे सुरु ठेवा.
  • तुमच्या डिव्हाईससाठी डिफॉल्ट लाईन (प्रायमरी/सेकंडरी) निवडा आणि Done वर क्लिक करा.
  • तुमचे ई-सिम (eSIM) ३० मिनिटांमध्ये अ‍ॅक्टिवेट होईल.

नवीन ग्राहक

जवळच्या वी स्टोरमध्ये जाऊन, ओळख दर्शवणारा पुरावा दाखवून तुम्ही ई-सिम (eSIM) मिळवू शकता. अ‍ॅक्टिवेशन प्रक्रिया अधिक सहजपणे करता येईल व तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रक्रिया पार पडल्याचा अनुभव घेता येईल.
वी ने आपल्या प्रीपेड ग्राहकांना सहजसुलभ अ‍ॅक्टिवेशन प्रक्रियेचे लाभ मिळावेत यासाठी www.myvi.in वर ऑनलाईन प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.

कोणत्या फोन्सवर मिळेल सुविधा

अ‍ॅप्पल: आयफोन एक्सआर आणि त्याच्या पुढील मॉडेल्सवर

वी ई-सिम (eSIM) आयओएस आणि अँड्रॉइड युजर्सना वापरता येईल. ही सेवा ज्यावर वापरता येईल अशा स्मार्टफोन्सची यादी पुढे दिली आहे:

सॅमसंग:
सॅमसंग गॅलॅक्सी सीरिज, जसे की, सॅमसंग गॅलॅक्सी झेड फ्लिप, सॅमसंग गॅलॅक्सी फोल्ड, सॅमसंग गॅलॅक्सी नोट २० अल्ट्रा, सॅमसंग गॅलॅक्सी नोट २०, सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड २, सॅमसंग गॅलॅक्सी एस२१ आणि त्यापुढील.
मोटोरोला: मोटोरोला रेझर, मोटोरोला नेक्स्ट जेन रेझर आणि मोटोरोला एज ४०
गुगल: गुगल पिक्सेल ३ आणि त्यापुढील
विवो: विवो x ९० प्रो
नोकिया: नोकिया जी६० आणि नोकिया एक्स३०

Source link

esimVi eSIMvodafone ideaवोडाफोन आयडियावोडाफोन आयडिया ई सिम
Comments (0)
Add Comment