याआधीच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, कंपनी ‘थर्ड पार्टी चॅट इन्फो स्क्रीन’ डेव्हलप करत आहे, ज्यामुळे यूजर्सना ‘थर्ड पार्टी ॲप चॅट्स’ची माहिती मिळू शकेल. आता ताज्या अहवालानुसार मात्र , भविष्यात व्हॉट्सॲप युजर्स त्यांच्या सोयीनुसार ‘थर्ड पार्टी चॅट्स’ मॅनेज देखील करू शकतील.
व्हॉट्सॲप ‘या’ नवीन फीचरवर करत आहे काम
‘WABetainfo’ च्या ताज्या अहवालानुसार, Google Play Store वर उपलब्ध ‘Android 2.24.6.2’ च्या अपडेटसाठी ‘WhatsApp beta’ ने ‘थर्ड पार्टी चॅट मॅनेज’ फीचरबद्दलची माहिती उघड केली आहे . ‘WABetainfo’ ही एक अशी वेबसाइट आहे जी ‘WhatsApp’ च्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवते आणि त्यातील माहिती बऱ्याच प्रमाणात बरोबर असल्याचे सिद्ध होते.
वेबसाइटने काल जारी केलेल्या अहवालात सांगण्यात आले होते की, व्हाट्सॲप ‘थर्ड पार्टी चॅट’साठी एक ‘इन्फो स्क्रीन’ तयार करत आहे, जिथून अशा थर्ड पार्टी बद्दल माहिती मिळवता येईल. तसेच आणखी एका नवीन डेव्हलप फीचरवरून असे दिसते की, मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप ‘थर्ड पार्टी चॅट’साठी अनेक फीचर आणण्याची तयारी करत आहे.
थर्ड पार्टी चॅट’ मॅनेजसाठी असतील दोन पर्याय
अहवालात या फीचर संबंधित स्क्रीनशॉट देखील दिला आहे. यामध्ये ‘थर्ड पार्टी चॅट’ मॅनेज करण्यासाठी उपलब्ध पर्याय दाखवले आहेत. स्क्रीनशॉटनुसार, युजर्सना ‘थर्ड पार्टी चॅट’ सेक्शनमध्ये ‘टर्न ऑफ’ आणि ‘सिलेक्टेड ॲप्स’ असे दोन पर्याय मिळतील. याचा अर्थ भविष्यात व्हॉट्सॲप युजर्सना व्हॉट्सॲपद्वारे कोणते थर्ड पार्टी ॲप त्यांच्याशी बोलू शकतात हे निवडण्याची मुभा असेल. तसेच, त्यांना हवे असल्यास ते ‘थर्ड पार्टी चॅट्स’ बंद देखील करू शकतात.
मात्र, या फीचरसाठी यूजर्सला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. सध्या ते डेव्हलपिंग स्टेजवर आहे. यानंतर, ॲपच्या भविष्यातील अपडेटसह पहिले टेस्टिंगसाठी हे फीचर बीटा युजर्ससाठी जारी केले जाईल. त्यानंतर ते स्टेबल व्हर्जनवर सर्व युजर्ससाठी रोल आउट होईल.