Apple च्या नवीन MacBook Air मॉडेल्स M3 चिपसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Apple नं दोन नवीन MacBook Air भारतात लाँच केले आहेत. हे मॉडेल्स M3 चिपसह आले आहेत. यात तुम्हाला १३ इंच आणि १५ इंचाचे स्क्रीन साइज ऑप्शन मिळतील. स्पेसिफिकेशन पाहता, नवीन मॉडेल्सची परफॉर्मन्स M1 चिपच्या तुलनेत ६० टक्क्यांनी जास्त वेगवान आहे. तसेच, Intel आधारित MacBook Air पेक्षा ही चिप १३ टक्के फास्ट आहे. तसेच यातील अपग्रेडेड Neural Engine शानदार स्पीड देईल असा दावा Apple नं केला आहे. तसेच याला कंपनीनं AI साठी बेस्ट कंज्यूमर लॅपटॉप देखील म्हटलं आहे. सिंगल चार्जवर हा लॅपटॉप १८ तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतो. चला जाणून घेऊया याची किंमत आणि वैशिष्ट्ये.

Apple MacBook Air M3 chip Price

किंमत पाहता, M3 चिप असलेल्या १३ इंच MacBook Air ची किंमत १,१४,९०० रुपयांपासून सुरु होते. याचा एज्युकेशन व्हेरिएंट १,०४,९०० रुपयांमध्ये येतो. विशेष म्हणजे Apple नं स्टुडंट्स आणि टीचर्ससाठी स्पेशल डिस्काउंट ऑफर आणली आहे. तसेच, दुसरीकडे १५ इंच मॉडेलची किंमत १,३४,९०० रुपयांपासून सुरु होते. याचा एज्युकेशन व्हेरिएंट १,२४,९०० रुपयांना मिळेल. यात कंपनीनं चार कलर ऑप्शन सादर केले आहेत, ज्यात स्पेस ग्रे, स्टारलाइट, सिल्व्हर आणि मिडनाइटचा समावेश आहे.
हे देखील वाचा: iPhone 15 मधील महत्वाचं फिचर गंडलंय, तुम्हाला देखील आलेय का समस्या?

MacBook Air M3 चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता, Apple MacBook Air M3 १३ इंच आणि १५ इंचाच्या स्क्रीन साइजमध्ये सादर करण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये ५०० नीट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे. हे दोन्ही मॉडेल्स M3 चिपसह आले आहेत, जोडीला ८ कोर सीपीयू आणि १० कोर जीपीयू मिळतो. वर सांगितल्याप्रमाणे या इन मॉडेल्समध्ये १६ कोर Neural Engine देखील देण्यात आला आहे. कंपनीनं हा AI साठी जगातील सर्वात बेस्ट लॅपटॉप असल्याचं म्हटलं आहे. जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत नवीन मॉडेल्समध्ये एक्सटर्नल डिस्प्ले कनेक्ट फीचर मिळतं. ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी दोन डिस्प्ले कनेक्ट करू शकाल. आधी ही सुविधा फक्त १ डिस्प्ले पर्यंत मर्यादित होती.

चिपसेट अपग्रेड व्यतिरिक्त यात कनेक्टिव्हिटीसाठी WiFi-6E चा वापर करण्यात आला आहे. त्याबाबत देखील सांगण्यात आलं आहे की हा जुन्या जनरेशनच्या तुलनेत दुप्पट फास्ट स्पीड देईल. ऑडियो व व्हिडीओ कॉल दरम्यान व्हॉइस क्वॉलिटी सुधारण्यासाठी यात Voice isolation आणि Wide spectrum मायक्रोफोन मोड्स देण्यात आले आहेत. व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 1080p Facetime कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात तुम्हाला ३ मायक्रोफोन व Spatial Audio आणि Dolby Atmos चा सपोर्ट मिळतो.

Source link

appleApple MacBook Air M3 chipMacBook Air M3 chipअ‍ॅप्पलअ‍ॅप्पल मॅकबुकअ‍ॅप्पल लॅपटॉप
Comments (0)
Add Comment