अर्धनारीश्वराशी जोडलेली मिथुन रास
मिथुन राशीला भगवान महादेवाच्या अर्धनारीश्वरच्या रूपाशी जोडून पाहिले जाते. भगवान महादेवाच्या अर्धनारीश्वर रूपाचा अर्थ आहे अर्धा पुरुष आणि अर्ध्या नारीचे स्वरूप. भगवान महादेवाच्या या रूपात शिव आणि शक्ती या दोघांचा वास असल्याचे मानले जाते. मिथुन याचा अर्थ आहे पुरुष आणि स्त्रीचे युग्म. तुम्ही मिथुन राशीचे प्रतीक पाहिले असेल त्यात स्त्री आणि पुरुषाचे युग्म दिसते. जर तुमची राशी मिथुन असेल तर तुम्ही महाशिवरात्रीला शिवाची आराधन जुरूर करावी.
चंद्राशी जोडलेली कर्क रास
कर्क रास ही चंद्राशी जोडलेली आहे. याचा अर्थ असा की भगवान महादेवाचे कर्क राशीवर नेहमी कृपाछत्र असते. चंद्रकोर भगवान शिवाच्या माथ्यावरही आभूषित आहे. तशाच प्रकारे भगवाने शिवाचे चंद्राची रास असलेल्या कर्कवर प्रेम आहे. चंद्र ही शीतलता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. भगवान शिवाचा क्रोध आपणा सर्वांना माहिती आहे. भगवान शिवाचा क्रोध प्रलयाला आमंत्रित करतो, त्यामुळे चंद्र भगवान शिवाल शीतलता देतो. त्यामुळे भगवान शिव शांत राहातात. जर तुमची राशी कर्क असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला जलाभिषेक आवश्य द्यावा.
महादेवाच्या नंदीशी जोडलेली वृषभ रास
भगवान शिवाचे वाहन नंदी आहे. नंदी भगवान महादेवाचा द्वारपाल आणि दूतही आहे. शिव मंदिरात द्वारपालाच्या रूपात नंदीची प्रतिमा आहे. अशी मान्यता आहे की तुमच्या मनोकामना जर नंदीच्या कानात सांगितली तर नंदी या मनोकामना भगवान महादेवापर्यंत पोहोचवतो. भगवान महादेव त्यांचा द्वारपाल आणि सेवक असलेल्या नंदीचा शब्द टाळत नाहीत. नंदी भगवान महादेवाला अतिशय प्रिय आहे, त्याच कारणामुळे नंदी देवाशी जोडलेली रास वृषभ ही भगवान महादेवाल प्रिय राशींपैकी एक आहे.
कुंभ राशीचा महादेवाशी संबंध
कुंभ राशी भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. भगवान शिवाच्या कुंभरूपी जटेत गंगा निवास करते. भगवान शिवाच्या या कुंभात गंगा असल्याने त्यांचे मस्तक शीतल राहाते. जेव्हा भागीरथ गंगामातेला पृथ्वीवर घेऊन आला, तेव्हा भगवान महादेवाने आपल्या जटांना कुंभाचे रूप देऊन गंगेचा प्रवाह या कुंभात धारण केला होता.
धनूचा संबंध आहे महादेवाच्या पिनाखी धनुष्याशी
भगवान महादेवाला धनू राशीही अत्यंत प्रिय आहे. भगवान महादेवाजवळ पिनाकी नावाचे एक धनुष्य आहे. धनुष्याचा संबंध धनू राशीशी आहे. भगवान शिव या धनुष्याचा वापर प्रलयासाठी करतात. भगवान महादेवाच्या या धनुष्याला मोठ्यात मोठे योद्धेही तोडू शकत नाही. श्रीरामाने या धनुष्याला प्रत्यंचा (दोरी) बांधून सीतेशी विवाह केला होता.